बारामतीत कायद्याचा धाक उरलाय कुठे? सुप्रिया सुळेंचा पोलीस यंत्रणेला सवाल; पोलीस अधीक्षकांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी

Supriya Sule

विशेष प्रतिनिधी

बारामती : उद्योजकाला खंडणीसाठी फोन, त्यानंतर थेट घराच्या आवारात घुसून वाहनावर गोळीबार… या घटनेने बारामतीतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस यंत्रणेवरच सवाल उपस्थित केले आहेत. बारामतीत गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नाही का, असा थेट प्रश्न उपस्थित करत त्यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी केली आहे.Supriya Sule

बारामती एमआयडीसी परिसरातील शिवशंभोनगर येथे उद्योजक राजन कोळेकर यांच्या निवासस्थानाजवळ शनिवारी (ता. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या चारचाकीवर दोन गोळ्या झाडल्या. विशेष म्हणजे, या घटनेच्या काही वेळ आधीच कोळेकर यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फोन करून दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणीची मागणी आणि त्यानंतर झालेला गोळीबार यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.Supriya Sule



 

सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. या प्रकरणाचा तपास बारामती तालुका पोलीस करीत आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमावर पोस्टद्वारे बारामतीतील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावून थेट घराच्या आवारात घुसून गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जात असेल, तर पोलिसांचा धाक नेमका कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला. अशा घटनांमुळे व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकही दहशतीच्या वातावरणात वावरत आहेत. बारामती शहर आणि परिसरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस नेमक्या कोणत्या उपाययोजना करीत आहेत, याचा सर्वंकष आढावा घेण्याची गरज असल्याचेही सुळे यांनी म्हटले आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या घटनेत तातडीने लक्ष घालून खंडणीची मागणी करणारे आणि गोळीबार करणारे आरोपी यांचा शोध घ्यावा. या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.

Where is the fear of the law left in Baramati? Supriya Sule asks the police administration.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात