बारामती गोळीबार प्रकरणात दोन अल्पवयीन तरुण पोलिसांच्या ताब्यात ; सीसीटीव्ही फुटेज समोर

Baramati shooting incident

बारामती : आधी इन्स्टाग्रामवरून दोन लाख रुपयांची खंडणी मागितली, मागणी धुडकावल्यानंतर अवघ्या दीड तासात तीन युवक दुचाकीवरून थेट बंगल्याच्या आवारात पोहोचले आणि पिस्तूलमधून गोळ्या झाडल्या. बारामती एमआयडीसी परिसरातील शिवशंभोनगर येथे बांधकाम व्यावसायिक राजन कोळेकर यांच्या डिफेंडर गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले असून, हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.Baramati shooting incident

कोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २१) दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. मी डीके बोलतोय, दोन पेटी दे, अशा शब्दांत संबंधित व्यक्तीने दोन लाख रुपयांची मागणी केली. मात्र, कोळेकर यांनी ही मागणी नाकारली. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास तीन युवक दुचाकीवरून त्यांच्या बंगल्याजवळ आले. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी दोघांनी परिसरातील परिस्थितीचा अंदाज घेतला.Baramati shooting incident



त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन युवकाने बंगल्याचे गेट उघडले आणि त्यानंतर तो पुन्हा दुचाकीवर जाऊन बसला. काही क्षणांतच दुचाकी सुरू करण्यात आली. त्यावेळी मागे बसलेल्या दोघांनी पिस्तूल बाहेर काढून बंगल्याच्या आवारातील कोळेकर यांच्या डिफेंडर गाडीच्या दिशेने गोळीबार केला. दोन राऊंड फायर केल्यानंतर तिघेही तेथून पसार झाले. गोळीबाराचा आवाज ऐकून कोळेकर बंगल्याच्या खाली आले. त्यांना चार चाकी च्या बाजूला गोळीबार झाल्याची लक्षात आले. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, पूर्वनियोजित पद्धतीने बंगल्याजवळ येऊन गोळीबार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत असल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले असून, अन्य संबंधितांचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.

राणा सूर्यवंशी प्रकरणानंतर पुन्हा गोळीबार….

बारामती परिसरात १८ ऑक्टोबर रोजी उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावरील कथित हल्ल्याचे प्रकरण चर्चेत आले होते. त्या घटनेनंतर आता पुन्हा एका व्यावसायिकाच्या घराजवळ गोळीबार झाल्याने बारामतीतील गुन्हेगारी घटनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, खंडणीची मागणी नाकारल्याच्या रागातून थेट घराजवळ येऊन गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांचे धाडस वाढत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. बारामती शहर आणि एमआयडीसी परिसरात वारंवार गंभीर स्वरूपाच्या घटना घडत असल्याने नागरिकांमधून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अल्पवयीन मुलांचा अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग समोर येणे हीदेखील चिंतेची बाब मानली जात आहे. या घटनेमागील सूत्रधार कोण, खंडणीची मागणी कोणी केली आणि हल्ल्यासाठी पिस्तूल कोठून उपलब्ध झाले, याचा उलगडा होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Two minors taken into police custody in connection with the Baramati shooting incident; CCTV footage emerges.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात