‘किटली, कपबशी अन् शिट्टी’; युगेंद्र पवारांच्या एका विधानाने प्रचारसभेत हास्यकल्लोळ

Yugendra Pawar

विशेष प्रतिनिधी

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार रंगू लागला असून, आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या दोन्ही पॅनलवर निशाणा साधताना युवा नेते युगेंद्र पवार यांनी मिश्किल शब्दांत टोलेबाजी केली. ‘किटलीशिवाय कपबशी भरत नाही. शिट्टी बघितली की सावध व्हा. अरे, भाजप आलं. ही लोकं आपल्याला नको आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले.

करंजे (ता. बारामती) येथे रविवारी (दि. ४) राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी युगेंद्र पवार बोलत होते. ‘निवडणुकीत खूप चिखलफेक होणार आहे. मात्र, त्यात आपण पडायचे नाही. आपण मुद्द्यांवर बोलूया आणि आपला प्रचार सकारात्मक मुद्द्यांवरच ठेवूया,’ असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.



‘अजितदादांनंतर पवारसाहेबांनी लक्ष घातले’

अजित पवार हयात असताना परिस्थिती वेगळी होती. मात्र, आता शरद पवार यांनी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले.

‘पवारसाहेबांशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितले की, दुर्दैवाने आता अजित राहिला नाही. कारखाना हा सभासदांचा प्रपंच आहे. येथील सहकारी साखर कारखानदारीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे आता मी लक्ष घालणार आहे,’ असे युगेंद्र पवार म्हणाले.

ग्रामीण भागात दौरे केल्यानंतर शरद पवार यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे जाणवले. ते नेहमीच सर्वांच्या हिताचा विचार करत आले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

‘सतिशमामांना साखरेचा शर्ट गिफ्ट देणार’

आमचाच एकमेव पॅनल आहे, ज्याने तीन महिलांना उमेदवारी दिली आहे. आम्ही निवडून आल्यास राज्यात किंवा देशात सर्वाधिक दर देण्याचा प्रयत्न करू. हा दर कसा देता येईल, याबाबत आमच्याकडे काही कल्पना आहेत. मात्र, त्या आताच सांगणार नाही, कारण विरोधक लगेच त्याची माहिती घेतील. आता आम्हीदेखील शहाणे झालो आहोत, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

उसाच्या उपपदार्थांपासून शर्ट तयार करता येऊ शकतो. आमचे सतिशमामा खोमणे यांचा मात्र यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला त्यांना ‘साखरेचा शर्ट’ भेट देणार आहे. तेव्हा त्यांचा विश्वास बसेल, असे युगेंद्र पवार म्हणताच सभेत एकच हशा पिकला.

Kettle, cup-and-saucer, and whistle’ — a single remark by Yugendra Pawar sparks peals of laughter at the campaign rally.

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात