अग्निवीरांना सैन्यात कायमची नोकरी; तिन्ही दलांचा सरकारकडे प्रस्ताव; सकारात्मक निर्णयाची अपेक्षा!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय सैन्य दले मजबूत करणाऱ्या अग्निवीरांसाठी लवकरच खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. तिन्ही सशस्त्र सैन्य दलाने 4 वर्षांनंतर 25 % हून अधिक अग्निवीरांना नोकरीत कायम ठेवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. नौदलाने सर्वाधिक जवान कायम करण्याची मागणी केली आहे; तर लष्कर आणि हवाई दलाने 25 % वरून 50 % पर्यंत वाढ करण्याची मागणी केली आहे. परंतु या प्रस्तावाला अजून अंतिम स्वरूप देण्यात आलेलं नाही. Agniveers

अग्निपथ योजनेत सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आलं होतं की, 4 वर्षांच्या सेवेनंतर मेरीटच्या आधारावर काही जवानांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव होता. यासाठी 25 % अग्नीवीर जवान कायम ठेवणार असल्याचे सांगण्यात आले होते. सुरुवातीला सर्वांना अग्निपथ योजनेतून मुक्त केलं जाईल. त्यानंतर सशस्त्र दलात रुजू होऊ इच्छिणाऱ्या अग्निवीरांनाच सामील केले जाते. ही निवड मेरीटच्या आधारावर केली जाते .



अग्निवीरांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव 

नौदलाने सर्वाधिक अग्निवीरांना कायम करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. नौदसाने 25 % हून थेट 75 % अग्निवीरांना कायम करण्याचा प्रस्ताव सादर केलाय. तर लष्कर आणि हवाई दलाने 50 % पर्यंत अग्निवीरांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु त्यांच्या मागणीवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. अग्निवीरांच्या समावेशाचा कोटा 25 % नी जरी वाढविला नाही, तरी काही विशिष्ट युनिट्समध्ये सैनिक समाविष्ट केले जाऊ शकतात. परंतु ही मर्यादा 25 % पर्यंत ठेवली जाईल. गेल्या वर्षी सुमारे 70000 अग्निवीर प्रशिक्षणासाठी सैन्यात दाखल झाले. पुढील वर्षी सैन्यातील अग्निवीरांची संख्या वाढवण्यासाठी रिक्त जागा 90 हजारांपर्यंत वाढवल्या जाऊ शकतात. सैन्यातील 1.8 लाख सैन्याची कमतरता दूर करण्यासाठी सैन्य तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे. इंडियन एक्स्प्रेसने ही बातमी दिली आहे.

अग्निपथ योजना काय आहे?

2022 साली सुरू झालेल्या अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना अग्नीवीर म्हणून सशस्त्र दलांमध्ये भरती केले जाते. या योजनेमुळे तरुणांना सशस्त्र दलांमध्ये काम करण्याची संधी मिळते. या योजनेअंतर्गत अग्निवीरांची 4 वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलांमध्ये भरती केले जाते. त्यांच्यासाठी सशस्त्र दलात एक विशेष पद दिले जाते. ते इतर पदापेक्षा वेगळे असते.

Permanent Army Jobs for Agniveers

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात