वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राम मंदिर देणगीची नुसती चोरी झाली नाही, तर तिथे लूट केली गेली आहे. दरोडा घातला गेला आहे, असा घणाघाती आरोप राम मंदिर निर्माण ट्रस्टचे प्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी केला होता. पण नृपेंद्र मिश्रा यांचे त्या वक्तव्याला विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी आज छेद दिला.
– नृपेंद्र मिश्रांच्या वक्तव्यावर भाष्य करायची गरज नाही
कथित अफरातफर प्रकरणावर बोलताना विश्व हिंदू परिषदेचे (VHP) आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले, “राम मंदिरातील चोरी ही छोटी मोठी घटना नाही. ही फार मोठी गंभीर घटना आहे त्यामुळे आम्ही सखोल चौकशीची आणि प्रत्येक आरोपाची तपासणी करण्याची मागणी केली. कुणी याला चोरी, लूट किंवा दरोडा असे काहीही म्हणो, त्याने काही फरक पडत नाही; प्रत्यक्षात काय घडले हे केवळ चौकशीतूनच स्पष्ट होईल. त्यामुळे, नृपेंद्र मिश्रा यांच्या विधानांवर भाष्य करण्याची मला काहीही गरज वाटत नाही.”
#WATCH | Delhi: On his letter to Ayodhya DSP, VHP International President Alok Kumar, says, "This would greatly assist the investigation. Ram Gopal Yadav said that this is a scam of more than Rs 20,000 crore, Priyanka Gandhi Vadra said that thousands of crores in donations come,… https://t.co/3A7GwQeHWb pic.twitter.com/Zq3O8gCiAF — ANI (@ANI) July 5, 2026
#WATCH | Delhi: On his letter to Ayodhya DSP, VHP International President Alok Kumar, says, "This would greatly assist the investigation. Ram Gopal Yadav said that this is a scam of more than Rs 20,000 crore, Priyanka Gandhi Vadra said that thousands of crores in donations come,… https://t.co/3A7GwQeHWb pic.twitter.com/Zq3O8gCiAF
— ANI (@ANI) July 5, 2026
#WATCH | Delhi: On the alleged Ram Mandir donation embezzlement case, VHP International President Alok Kumar, says, "We have demanded a thorough investigation, an inquiry into every single allegation. Whether someone calls it theft, looting, or dacoity is irrelevant; only the… pic.twitter.com/UDyvouQIyc — ANI (@ANI) July 5, 2026
#WATCH | Delhi: On the alleged Ram Mandir donation embezzlement case, VHP International President Alok Kumar, says, "We have demanded a thorough investigation, an inquiry into every single allegation. Whether someone calls it theft, looting, or dacoity is irrelevant; only the… pic.twitter.com/UDyvouQIyc
विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय समितीची बैठक अयोध्येऐवजी दिल्लीला हलविण्याबाबत ते म्हणाले, “आम्ही बैठक इथे घेतो की तिथे, यावर प्रश्न का उपस्थित केला जावा?, तशी बिलकूल गरज नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, जूनमध्ये तिथे बैठक घेण्याचे नियोजन होते, परंतु स्थानिक परिस्थितीमुळे काही व्यावहारिक अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळे ती बैठक पुढे ढकलावी लागली. आता आम्ही ही बैठक दिल्लीत घेत आहोत, तेव्हा आम्ही बैठक अयोध्येत का घेत नाही??, याबद्दल विश्व हिंदू परिषदेला प्रश्न विचारण्याचा किंवा सल्ला देण्याचा अधिकार कोणालाही आहे असे मला वाटत नाही. आम्हाला जिथे सोयीचे वाटेल, तिथे आम्ही ती बैठक घेऊ.”
– यादव, प्रियांकांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
अयोध्येच्या पोलीस उपाधीक्षकांना (DSP) लिहिलेल्या पत्राबाबत बोलताना आलोक कुमार म्हणाले, “यामुळे तपासात मोठी मदत होईल. राम गोपाल यादव यांनी हा २०,००० कोटी रुपयांहून अधिकचा घोटाळा असल्याचे म्हटले, एवढा पैसा तिथे आल्याची आमची माहिती नाही, तर प्रियंका गांधी वाड्रा यांनी हजारो कोटींची देणगी येत असल्याचे विधान केले; परंतु आम्हाला माहिती असलेल्या माहितीनुसार तशी परिस्थिती नाही. पण हे सगळे बडे आणि सुशिक्षित लोक आहेत, जे दीर्घकाळापासून उच्च पदांवर राहिले आहेत; त्यामुळे नक्कीच त्यांनी काहीतरी आधार घेऊनच ही विधाने केली असणार. मला असे वाटले की, पोलिसांनी त्यांना या विधानांशी संबंधित पुरावे, माहिती किंवा साक्षीदार सादर करण्यास सांगावे, जेणेकरून त्यांचा समावेश करून तपास पूर्ण करता येईल. म्हणूनच मी तसे म्हटले आणि यात मी त्यांच्यावर कोणताही आरोप केला नाही.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App