कांद्यावरची निर्यात बंदी उठवली तरी विरोधकांना पोटदुखीच; फडणवीसांचा निशाणा!!

विशेष प्रतिनिधी

नागपूर :  शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कांद्यावरची निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली तरी विरोधकांना पोटदुखीच झाली. त्यांनी आता निर्यात बंदी वरूनही राजकारण सुरू केले, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज महाराष्ट्रातल्या सर्व विरोधकांवर निशाणा साधला.Even if the export ban on onion is lifted, the opponents have a stomach ache; Target of Fadnavis!!

शेतकऱ्याच्या प्रश्नावरुन विरोधकांनी नेहमी राजकारणच केले. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांचे आणि सामान्य माणसाचे हित पाहत असताना संकटकाळात विविध योजना जाहीर करत त्यांना दिलासा देण्याचे काम केले, मात्र विरोधकांकडे काहीच मुद्दे नसल्यामुळे ते आता कांद्यावर राजकारण करत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.



देवेंद्र फडणवीस नागपुरात बोलत होते. कांद्यावरील निर्यातबंदी हटवल्यामुळे उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. काद्याची निर्यात बंदी हटविण्याची मागणी केंद्र सरकारकडे वारंवार करत होतो. केंद्र सरकारने ती मान्य केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले असून विरोधक मात्र शेतकऱ्यासाठी काही न करता त्यांच्या नावावर केवळ राजकारण करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव वाढत असल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मी, आम्ही तिघेजण केंद्र सरकारच्या पाठीमागे यासाठी लागून होतो. शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची बाब आम्ही केंद्र सरकारला कळवली होती. त्याला आता प्रतिसाद मिळाला. देशात कांद्याची कमतरता झाली तर बाहेरच्या देशातून आयात करावा लागतो. मात्र आता निर्यात बंदी हटविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Even if the export ban on onion is lifted, the opponents have a stomach ache; Target of Fadnavis!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात