विशेष प्रतिनिधी
पुणे : देशात आरक्षणावर 50% मर्यादा आली काँग्रेस सरकारच्याच काळात, पण आता ती हटविण्याचे राहुल गांधींनी दिले मोदींना आव्हान!! राहुल गांधींनी आज पुण्यातल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आरक्षणावर लागू असलेली 50% मर्यादा हटवण्याचे आव्हान दिले.50% reservation limit came during Congress government, but Rahul Gandhi challenged Modi to remove it!!
काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची पुण्यात जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे जातनिहाय जनगणनेचे कार्ड खेळले. मोदी अदानी देशातली 70 % संपत्ती मोदींच्या 22 मित्रांच्या हातात, मोदींचा 16 लाख कोटींचा घोटाळा हे मुद्दे राहुल गांधींच्या भाषणात नेहमी असतात तेच मुद्दे त्यांनी पुण्याच्या भाषणात रिपीट केले.
पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक आव्हान दिले. देशात 50 % आरक्षण मर्यादा लागू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुठल्यातरी एका जाहीर सभेत हे सांगण्याची हिंमत करावी की आम्ही 50 % आरक्षणाची मर्यादा हटवू. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे तसे ठरलेच आहे. आम्ही सत्तेवर आलो, तर पहिले काम आरक्षणावरची 50 % मर्यादा हटवण्याचे करू, असे आश्वासन राहुल गांधींनी दिले.
पण मूळात देशात आरक्षणावर 50 % मर्यादा आली, तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार अस्तित्वात होते. 1992 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने आरक्षणावर 50 % मर्यादा लागू केली ओबीसींना 27 % आरक्षण आणि त्या खेरीज इतर कोणालाही आरक्षण द्यायचे असेल, तर कुठलेही निकष लावले, तरी ते आरक्षण 50 % च्या वर जाता कामा नये, असा निर्बंध सुप्रीम कोर्टाने लावला. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार अस्तित्वात होते. काँग्रेस सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये युक्तिवाद करताना त्यावर कुठलेही नकारात्मक भाष्य केले नव्हते. काँग्रेस सरकारने सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय निमूटपणे स्वीकारला होता, मात्र आता मात्र आपल्याच काँग्रेस सरकारचा जुना निर्णय फिरवण्याची हिंमत दाखवण्याचे आव्हान राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more