देशाला पुन्हा फाळणीकडे ढकलण्याचा दुर्भावनापूर्ण प्रयत्न काँग्रेस करत आहे Congress wants to impose Taliban rule Yogi criticizes
विशेष प्रतिनिधी
एटा : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एटा येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपचे लोकसभा उमेदवार राजवीर सिंह राजू भैया यांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. बाबासाहेब भीमराव आंबेडकर हे देशात धर्माच्या आधारावर आरक्षणाच्या विरोधात होते, मात्र काँग्रेस मुद्दाम देशाचे इस्लामीकरण करण्याच्या उद्देशाने तालिबान राजवट लादू इच्छित आहे, असे ते म्हणाले.
याद्वारे देशाला पुन्हा फाळणीकडे ढकलण्याचा दुर्भावनापूर्ण प्रयत्न काँग्रेस करत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि सपा यांच्यातील युतीपासून सावध राहायला हवे. या लोकांना मागास जाती आणि अनुसूचित जाती आरक्षणाऐवजी मुस्लिमांना आरक्षण द्यायचे आहे, हा बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान आहे.
योगी म्हणाले की ही तीच काँग्रेस आहे जी म्हणायची की राम कधीच अस्तित्वात नाही, तर आम्ही म्हणत होतो रामलला हम मंदिर वही बनायेंगे. हे आम्ही दाखवूनही दिले आहे. तर सपा म्हणायचे की, अयोध्येत परिंदा भी पर नही मार सकता, पण पूज्य कल्याण सिंह यांचे बलिदान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने अयोध्येत रामललाचे भव्य मंदिर उभारले गेले आहे. . एवढेच नाही तर देशात पहिल्यांदाच देशाच्या राष्ट्रपतींनी राम मंदिरात रामललाचे दर्शन घेतले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more