वृत्तसंस्था
भोपाळ : मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळमध्ये कमला नेहरू रुग्णालयात आगीत होरपळून चार बालकांचा मृत्यू झाला.Fire erupts at Bhopal hospital, 4 children burnt alive; Ineffective fire extinguishing system
भोपाळच्या हमीदिया कैम्पसमधील कमला नेहरू रुग्णालयात ही आग लागली. रुग्णालयाच्या बालरोग उपचार केंद्रात तिसऱ्या मजल्यावर सोमवारी रात्री ९ वाजता ही आग लागली असून तेथे ४० बालकांना ठेवले होते. त्यापैकी ४ बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन पुरविणारे रुग्णालय म्हणून कमला नेहरूची ख्याती आहे.
रुग्णांना शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा दावा करण्यात आला आहे. आगीनंतर स्फोट झाला. शॉर्ट सर्किटनंतर व्हेंटिलेटरला आग लागली आणि ती थेट बालके ठेवली होती तेथे जाऊन पोचली. ४ बालके दगावली असून ३६ बालकांना दुसऱ्या विभागात हलविले आहे.
आठ मजली इमारतीत अग्निशामक यंत्रणा कार्यरत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आग आटोक्यात आणता आली नाही. प्रत्येक मजल्यावर ऑटोमेटिक हाईड्रेंट आणि फायर एक्सटिंग्विशर ठेवले आहेत. पण, त्या पैकी एकही कार्यरत नव्हता.सर्वच बंद पडले होते.
अनेक नातेवाईक आमची मुले कुठे गेली? असा टाहो फोडून मंगळवारी सकाळी गोंधळ घालत असल्याचे दिसले.अग्निशमन अधिकारी रामेश्वर नील यांच्या नुसार हमीदिया रुग्णालयाने आगीबाबत ना हरकत प्रमाणपत्र घेतले. पण, कमला नेहरू रुग्णालयाने गेल्या १५ वर्षात घेतलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App