नवी दिल्ली – ‘एनएसओ’सारख्या कंपन्यांना त्यांची उत्पादने बिगर सरकारी आणि खासगी कंपन्यांना विक्री करण्याची परवानगी दिली जात नाही,’’ असे स्पष्ट मत इस्राईलचे भारतातील नवनियुक्त राजदूत नाओर गिलॉन यांनी मांडले.Israyili ambeedoor spoke on pegasis
भारतामध्येही याच कंपनीने तयार केलेल्या पेगॅसस या स्पायवेअरचा पाळत ठेवण्यासाठी वापर झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर केंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत.याबाबत विचारणा केली असता गिलॉन यांनी हा त्या देशाचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, ‘‘ मी याबाबत फार खोलात गेलेलो नाही कारण ‘एनएसए’ ही खासगी इस्राईली कंपनी आहे.
‘एनएसओ’ला त्यांचे कोणतेही उत्पादन अन्य देशाला विकण्यापूर्वी इस्राईली सरकारची परवानगी घ्यावी लागते. स्पायवेअरच्या बाबतीत देखील हाच नियम लागू होतो केवळ सरकारलाच त्याची खरेदी करता येते. सध्या भारतामध्ये जे काही घडते आहे
तो त्या देशाचा अंतर्गत प्रश्न् असून मला त्याकडे फारसे लक्ष द्यायचे नाही.’’ या स्पायवेअरच्या माध्यमातून भारतात विरोधी पक्ष नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि काही मंत्र्यांवर पाळत ठेवण्यात आल्याचा आरोप होतो आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more