बाळासाहेब थोरातांवर स्तुतिसुमने उधळताना विदर्भातल्या सुनील केदार यांचे विदर्भातल्याच नानांना आव्हान!!


विशेष प्रतिनिधी

संगमनेर : संगमनेरच्या राजहंसमध्ये झालेल्या कार्यक्रमात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी नाना पटोले यांच्या नेतृत्वालाच एकप्रकारे आव्हान देऊन टाकले. 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसला बाळासाहेब थोरात यांच्या सारखे संयमी शांत आणि कणखर नेतृत्व अपेक्षित आहे. महाविकास आघाडीचे ते मोठे आधारस्तंभ आहेत. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. परंतु बाळासाहेबांच्या नेतृत्वामुळे हे शक्य झाले, अशी स्तुतिसुमने उजळणी उधळली.Sunil Kedar from Vidarbha challenges Nana from Vidarbha while praising Balasaheb Thorat !!

संगमनेर मध्ये राजहंसच्या दूध भुकटी प्रकल्पाचे उद्घाटन सुनील केदार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडी स्थापन होत असताना बाळासाहेब थोरात यांनी शांत आणि संयमी नेतृत्वाचा परिचय दिला. राजकीय कौशल्याने काँग्रेसला अडचणीच्या काळात नेतृत्व दिले, असे सुनील केदार म्हणाले.काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार संग्राम थोपटे यावेळी उपस्थित होते. त्यांनी देखील बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या शांत संयमी नेतृत्वाचा पॅटर्न पश्चिम महाराष्ट्रात देखील राबविला पाहिजे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला वाढण्यासाठी तिथे मोठा वाव मिळू शकेल, असे उद्गार काढले.

या दोन्ही नेत्यांची भाषणे बाळासाहेब थोरात यांच्या स्तुतीने भरलेली असताना हे एक प्रकारे राजकीय वर्तुळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आव्हान मानले जात आहे. नाना पटोले हे काँग्रेससाठी स्वबळाची भाषा वापरत असतात. संपूर्ण राज्यात संघटन मजबूत करून काँग्रेसने स्वबळावर 2024 निवडणूक लढवून सत्ता मिळवली पाहिजे, असे नाना पटोले यांनी लोणावळ्याच्या मेळाव्यात सांगितले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी पंगा घेण्याची भाषाही वापरली होती.

या पार्श्वभूमीवर विदर्भतील सुनील केदार आणि पश्चिम महाराष्ट्रातील संग्राम थोपटे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या शांत आणि संयमी नेतृत्वाची स्तुती करणे यालाच नाना पटोले यांना दिलेले आव्हान मानले जात आहे.

Sunil Kedar from Vidarbha challenges Nana from Vidarbha while praising Balasaheb Thorat !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात