भोपाळच्या काँग्रेस मुख्यालयासमोर अवतरले कमलनाथ “कृष्ण”; शिवराज मामा “कंस” यांचे पोस्टर!!!

वृत्तसंस्था

भोपाळ : मध्य प्रदेशच्या काँग्रेस मुख्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री कमल नाथ आणि मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांची अनोखी पोस्टर्स लावली आहेत. काँग्रेसने कमल नाथ यांना “कृष्ण रूप” दिले आहे, तर शिवराज सिंग चव्हाण यांना “कंस रूप” दिले आहे. A poster depicting Congress’ Kamal Nath as Lord Krishna & Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan as ‘Kans Mama’ was put up outside Cong office, Bhopal.

भोपाळमधील काँग्रेसचे स्थानिक नेते शहरयार खान यांनी पुढाकार घेऊन ही पोस्टर्स लावली आहेत. कमल नाथ सरकारने गेल्या पंचवार्षिकमध्ये केलेल्या उज्ज्वल कामगिरीचा आढावा आणि शिवराज सिंग सरकारच्या जनता विरोधी धोरणांचे वाभाडे या पोस्टर मधून काढण्यात आले आहेत.पृथ्वीवर जेव्हा पाप वाढते तेव्हा मनात कमल नाथ यांच्यासारख्या पापमोचकांना देव पृथ्वीवर पाठवतो, अशा शब्दांमध्ये शहरयार खान यांनी कमलनाथ यांची भलामण केली आहे. शिवराज सिंग चौहान हे कंस मामा यांच्यासारखे मध्यप्रदेशचे राज्य चालवत आहेत जनतेवर जुलूम करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. परंतु लवकरच कमल नाथ हे कृष्ण रूपाने येऊन कंस मामा यांच्या राज्याचा नायनाट करतील असा आशावादही शहरयार खान यांनी व्यक्त केला आहे.

A poster depicting Congress’ Kamal Nath as Lord Krishna & Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan as ‘Kans Mama’ was put up outside Cong office, Bhopal

महत्त्वाच्या बातम्या