तालिबान बरोबर भारताची प्रथमच थेट चर्चा; कतार – दोहामध्ये बैठक; दहशतवादाबाबत दिला भारताने दिला कठोर इशारा


वृत्तसंस्था

दोहा (कतार) : अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीने कब्जा केल्यानंतर प्रथमच भारतीय प्रतिनिधींनी तालिबानी राजवटीच्या प्रतिनिधींशी कतारची राजधानी दोहा येथे भेट घेऊन चर्चा केली आहे. Indian envoy meets Taliban representative in Doha after complete US troops’ withdrawal

अफगाणिस्तानातून कोणत्याही स्थितीत भारतात दहशतवादी येऊ नयेत. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला अफगाण भूमीवर स्थान मिळू नये, अशा प्रकारचा स्पष्ट इशारा भारतीय प्रतिनिधी मंडळाने तालिबानी प्रतिनिधी मंडळाला दिला आहे. अफगाणिस्तानात तालिबानी कब्जा केल्यानंतर पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानात तळ बनविल्याच्या बातम्या आलेल्या आहेत, तसेच तालिबानच्या दहशतवाद्यांशी त्यांनी कंदहारमध्ये चर्चा केल्याचेही बातम्या आल्या आहेत. जैश ए मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांची काश्मीरमध्ये हल्ला करण्याची योजना असून त्यासाठी तालिबानकडून मदत घेण्याचा त्यांचा मनसूबा आहे. या संदर्भातले गुप्तचर रिपोर्ट भारताकडे पुराव्यांसह हातात आहेत.



या पार्श्वभूमीवर भारतीय प्रतिनिधींनी तालिबानी प्रतिनिधींची दोहामध्ये भेट घेऊन अफगाण भूमीतून कोणत्याही प्रकारे दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात येऊ नये. कोणत्याही संघटनेला भारत विरोधी कारवाया करण्यासाठी मदत करण्यात येऊ नये, असा इशारा दिला आहे. अफगाण जनतेशी भारताचे मैत्री संबंध कायम राहतील. तालिबानी राजवटीचा अनुभव लक्षात घेऊन त्या राजवटीशी संबंध ठेवण्यात येतील, असे भारतीय प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे.

भारताने अफगाणिस्तानातील विकास कामे चालू ठेवावीत, असे आवाहन तालिबानी प्रतिनिधींनी भारतीय प्रतिनिधी मंडळाला केले. दहशतवादा संदर्भात भारत कोणतीही तडजोड करणार नाही. दहशतवादाशी कठोर मुकाबला केला जाईल. प्रसंगी दहशतवाद जिथून उद्भवला आहे त्याच्या मूळावरच आघात करायला भारत कमी करणार नाही, असा इशाराही भारतीय प्रतिनिधी मंडळाने तालिबानी प्रतिनिधी मंडळाला दिला आहे.

Indian envoy meets Taliban representative in Doha after complete US troops’ withdrawal

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात