शरद पवारांचे रणनितीचे धडे, भाजपला फायदा होईल अशा आघाड्या करू नका


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्र्यांना रणनितीचे धडे दिले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी आघाडी जेथे फायदा होईल त्या ठिकाणी करा. मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजपला फायदा होईल, अशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाड्या करू नका, असे आदेश पवार यांनी दिले आहेत. Lessons of Sharad Pawar’s strategy, do not front with other parties in a way that will benefit BJP

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतली. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करण्याला ठाम विरोध केला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यावेळी ओबीसींचे आरक्षण दिल्याशिवाय या निवडणुका होणार नाहीत, या भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे, असे पवार यांनी सांगितले



निवडणुकीत निश्चित अशी रणनीती आखूनच सामोरे गेले पाहिजे असे सांगून पवार म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत भाजपला फायदा होईल अशी कृती आपल्याकडून होऊ नये, यासाठी बारकाईने नियोजन करा. सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र येण्याने किंवा न येण्याने भाजपचा फायदा होणार आहे की नाही, हे आधी तपासा. जेथे भाजपाचा फायदा होणार असेल, त्या ठिकाणी तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या. कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका जिंकण्यासाठीच लढा द्यावा लागेल. प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे संख्याबळ कसे कमी होईल, या दृष्टीनेच आखणी झाली पाहिजे.

प्रत्येक नेत्याकडे एका जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येईल. त्या जिल्ह्यात शिवसेना आणि काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही, याबाबत त्यांनी निर्णय घ्यावेत. निर्णय जाहीर करण्याआधी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करावी, असे सांगून पवार म्हणाले की, स्थानिक पातळीवर नेमकी परिस्थिती काय आहे? त्यानुसारच आघाडीबद्दलचे निर्णय घ्यावेत; पण विनाकारण सत्ताधारी पक्षांमध्ये कटुता निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करू नका.

Lessons of Sharad Pawar’s strategy, do not front with other parties in a way that will benefit BJP

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात