आंध्र, राजस्थानचा हा आदर्श मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेणार का?


आंध्र प्रदेशापाठोपाठ रास्थानमध्येही सर्व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णालयांचा उपचार मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही राज्यांचा आदर्श महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. महात्मा फुले जीवनदायिनी योजना असूनही महाराष्ट्रात कोरोना रुग्णांवर मोफत उपचार होत नाहीत. Will Uddhav Thackeray take this ideal from Andhra and Rajasthan?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशापाठोपाठ रास्थानमध्येही सर्व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णालयांचा उपचार मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही राज्यांचा आदर्श महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. महात्मा फुले जीवनदायिनी योजना असूनही महाराष्ट्रात कोरोना रुग्णांवर मोफत उपचार होत नाहीत.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा फायदा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जोडल्या गेलेल्या सर्व परिवारांना मिळणार आहे. राजस्थान राज्य आरोग्य विमा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणा राजोरिया यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजनेशी जोडले गेलेल्या कोरोना रुग्णांना सर्व खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळेल याकडे लक्ष द्यावं अशी सूचना करण्यात आली आहे. या योजनेशी जोडले गेलेल्या कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी एखाद्या रुग्णालयाने नकार दिला तर त्या रुग्णालयाविरोधात कठोर पाऊल उचलावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.



राज्य सरकारच्या आदेशानंतर कोरोना संक्रमित रुग्णांच्या उपचारासाठी मान्यता प्राप्त रुग्णालयांमध्ये चिरंजीवी योजनेशी जोडले गेलेल्या कुटुंबाला कोरोनावरील उपचारासाठी नवे पॅकेज मंजूर केलं आहे. या आदेशाचं पालन न करणाऱ्या रुग्णालयांविरोधात कठोर पाऊल उचललं जाईल, असा इशाराही राजस्थान सरकारने दिला आहे.

चिरंजीवी योजने अंतर्गत प्रत्येक परिवाराला 5 लाखापर्यंत कॅशलेश विमा कव्हर

राजस्थान सरकारने 1 मे 2021 पासून चिरंजीवी योजनेची सुरुवात केली आहे. सरकारच्या या विमा योजनेशी आतापर्यंत 22 लाखापेक्षा अधिक कुटुंब जोडले गेले आहेत. 3 हजार 500 कोटी रुपयांच्या या योजनेत राज्यातील प्रत्येक परिवाराला 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक विमा कव्हर मिळणार आहे. या योजनेशी जोडले जाण्यासाठी सरकारने 31 मे 2021 ची वेळमयार्दा निश्चित करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात गोरगरीब रुग्णांची कोरोना उपचारासाठी लूट केली जात आहे. खासगी रुग्णालयांकडून अवाच्या सवा बिले दिली जातात. काही रुग्णालयांनी तर बिल भरले नाही म्हणून मृतदेह ताब्यात दिले नाहीत अशा घटनाही उघड झाल्या आहेत.

Will Uddhav Thackeray take this ideal from Andhra and Rajasthan?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात