कोरोना एक किरकोळ फ्लू असल्याची पोस्ट केल्याने कंगना रनौटवर इन्स्टाग्रामची कारवाई


कोरोना एक किरकोळ फ्लू आहे, अशी पोस्ट केल्याने अभिनेत्री कंगना रनौटवर इन्स्टाग्रामने कारवाई केली आहे. कंगनाची ही पोस्ट अशास्त्रीय असल्याने हटविण्यात आली असल्याचे इन्स्टाग्रामने म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना एक किरकोळ फ्लू आहे, अशी पोस्ट केल्याने अभिनेत्री कंगना रनौटवर इन्स्टाग्रामने कारवाई केली आहे. कंगनाची ही पोस्ट अशास्त्रीय असल्याने हटविण्यात आली असल्याचे इन्स्टाग्रामने म्हटले आहे. Instagram action on Kangana Ranaut for posting that Corona has a minor flu

कंगनाने आपल्या पोस्टमध्ये कोरोनाला एक किरकोळ फ्लू असल्याचे वर्णन केलं होते. कंगनाला नुकतीच कोरोनाबाधित झाली आहे. कंगनाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली माहिती तिने स्वत: सोशल मीडियाच्या माधमातून आपल्या चाहत्यांना दिली होती. त्यासोबत तिने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ध्यानधारणा करताना दिसत आहे. तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की मागील काही दिवसांपासून मला खूप थकवा आला होता आणि माझे डोळे देखील जळजळत होते. हिमाचलला जाण्यापूर्वी मी काल माझी कोरोना टेस्ट करून घेतली होती आणि आज त्याचा निकाल आला आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. हे काळातच मी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. हा विषाणू माझ्या शरीरात आहे, हे मला काहीच माहिती नव्हते. आता मला माहित आहे की, मी यातून लवकरच पूर्णपणे बरी होईन.आता तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलं आणि सांगितलं की तिची पोस्ट इन्स्टाग्रामवरुन हटवली गेली आहे. कंगनाने लिहिले आहे की, इन्स्टाग्रामने माझी पोस्ट हटवली आहे, ज्यात मी अशी धमकी दिली होती की मी कोरोनाला संपवणार आहे. मी ट्विटरवर अतिरेकी आणि कम्युनिस्टांची सहानुभूती ऐकली होती मात्र कोरोना फॅन क्लब मस्तच. मला इन्स्टाग्रामवर येऊन दोन दिवस झाले आहेत. असे दिसतेय की मी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ इथे टिकू शकणार नाही.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाल्यापासून कंगना तृणमूल कॉँग्रेस विरोधात विविध प्रकारचे ट्विट करत होती. भाजपला पाठिंबा देत कंगना उघडपणे टीएमसीवर निशाणा साधत होते. गँगरेपचा आरोप करत कंगनाने टीएमसीविरोधात ट्वीट केले होते, त्यानंतर ट्विटरने तिचे खाते निलंबित केले गेले होते. कंगनाचे खाते आता कायमचे निलंबित करण्यात आले आहे.

Instagram action on Kangana Ranaut for posting that Corona has a minor flu

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण