बंगालमधील हिंसाचाराचा जाब विचारणाऱ्या कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट सस्पेंड, चाहत्यांकडून सोशलवर संताप

Kangana Ranaut Twitter account suspended After Her Tweets On Bengal Violence By TMC Workers

Kangana Ranaut Twitter account suspended : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या बेधडकपणासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तर कंगनाचे ट्वीट्स म्हणजे जाळ अन् धूरच असतो. पण सोशल मीडियावरील कॉमेंटच तिला महागात पडली आहे. बंगाल निवडणूक निकालावर कंगनाने केलेल्या अनेक ट्वीट्समुळे तिच्यावर कोलकात्यात गुन्हा दाखल झाला होता. आता ट्वीटरनेही कारवाई करत कंगना रनौतचे ट्वीटर अकाउंट सस्पेंड केले आहे. बॉलीवूड क्वीन कंगनासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. Kangana Ranaut Twitter account suspended After Her Tweets On Bengal Violence By TMC Workers


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या बेधडकपणासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तर कंगनाचे ट्वीट्स म्हणजे जाळ अन् धूरच असतो. पण सोशल मीडियावरील कॉमेंटच तिला महागात पडली आहे. बंगाल निवडणूक निकालावर कंगनाने केलेल्या अनेक ट्वीट्समुळे तिच्यावर कोलकात्यात गुन्हा दाखल झाला होता. आता ट्वीटरनेही कारवाई करत कंगना रनौतचे ट्वीटर अकाउंट सस्पेंड केले आहे. बॉलीवूड क्वीन कंगनासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अनेक वादग्रस्त व बेधडक ट्वीट्समुळे कंगना नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. भाजपची खुली समर्थक म्हणूनही तिला ओळखले जाते. परंतु ट्वीटरच्या या अनपेक्षित कारवाईमुळे कंगनाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एवढेच नव्हे, तर ट्वीटरची कारवाई ही पक्षपातीपणाची असल्याचेही चाहते म्हणत आहेत.

 Kangana Ranaut Twitter account suspended After Her Tweets On Bengal Violence By TMC Workers

बंगालमधील हिंसेवर बोलणे कंगनाची चूक होती काय?

निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाले आहे. परंतु निकालानंतर पुन्हा एकदा हिंसाचाराचे सत्रही सुरू झाले आहे. कंगनाने याच निवडणूक निकालावर व बंगालमधील तृणमूलकडून सुरू असलेल्या हिंसेबद्दल बेधडकपणे आपले विचार ठेवले होते. परंतु, बंगालच्या पोलिसांनी हिंसा करणाऱ्यांना जेरबंद करायचे सोडून ट्वीट करणाऱ्या कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता ट्वीटरनेही कंगनाचे थेट अकाउंटच सस्पेंड केले आहे.

 Kangana Ranaut Twitter account suspended After Her Tweets On Bengal Violence By TMC Workers

पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रकारे हिंसाचार घडत आहेत त्यावरून कंगनाने टीएमसीला लक्ष्य केले होते. टीएमसी गुंडांकडून एका भाजप महिला कार्यकर्तीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोपही अभिनेत्रीने केला आहे. कंगनाने यासंबंधी एक फोटोही शेअर केला होता. कंगनाचा हा आरोप व्हायरल होण्यापूर्वीच तिचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.

कंगनाचे अकाउंट सस्पेंड झाल्याने चाहते निराश आहेत, ट्वीटरच्या या एकतर्फी कारवाईविरुद्ध सोशल मीडियावर रोष व्यक्त होत आहे. कंगनावर केलेल्या कारवाईमुळे काही जण खुश आहेत, तर काही जण संतप्तही झाले आहेत. यापूर्वी कंगनाची बहीण रंगोली चंदेल यांचेही अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते.

Kangana Ranaut Twitter account suspended After Her Tweets On Bengal Violence By TMC Workers

महत्त्वाची बातमी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात