CPI (M) criticizes Bengal violence, Yechury says violence is reprehensible, Mamata Banerjee should focus on epidemic

बंगालमधील हिंसाचारावर माकपचीही टीका, येचुरी म्हणाले- हिंसा निंदनीय, ममतांनी विजयोत्सव सोडून महामारीवर लक्ष द्यावे

Bengal violence : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचाराचे सत्र सुरू आहे. निकालानंतर आतापर्यंत 9 भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. दुसरीकडे, मंगळवारी सकाळीच तृणमूलच्या गुंडांकडून भाजप उमेदवार व जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ गोवर्धन दास यांच्या घरावरही बॉम्ब हल्ला करण्यात आला. आता डाव्यांनीही बंगालमधील हिंसेवरून तृणमूल काँग्रेस व ममता बॅनर्जींवर टीका केली आहे. CPI (M) criticizes Bengal violence, Yechury says violence is reprehensible, Mamata Banerjee should focus on epidemic


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचाराचे सत्र सुरू आहे. निकालानंतर आतापर्यंत 9 भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. दुसरीकडे, मंगळवारी सकाळीच तृणमूलच्या गुंडांकडून भाजप उमेदवार व जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ गोवर्धन दास यांच्या घरावरही बॉम्ब हल्ला करण्यात आला. आता डाव्यांनीही बंगालमधील हिंसेवरून तृणमूल काँग्रेस व ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.

माकप नेते सीताराम येचुरी यांनी ट्वीट केले की, “बंगालमधील हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत? हा त्यांचा विजयोत्सव आहे का? याचा विरोध झाला पाहिजे. कोरोना महामारीचा मुकाबला करण्याऐवजी तृणमूल अशी कामे करत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नेहमीच लोकांच्या मदतीसाठी तत्पर आहे.”

बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या दुसर्‍याच दिवसानंतर सोमवारी ठिकठिकाणी मोठा हिंसाचार उफाळला. यात अनेक भाजप कार्यकर्ते ठार झाले आणि कित्येक जखमीही झाले. तृणमूल कार्यकर्त्यांनी हल्ले करून सर्वसामान्यांची दुकानेही लुटल्याचे वृत्त आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या हल्ल्याच्या घटनेवर राज्य सरकारकडे तथ्यात्मक अहवाल मागवला आहे.

दुसरीकडे, बंगालचे राज्यपाल धनकर यांनी पोलिसांना या हिंसाचाराचा जाब विचारला असून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत. ममता बॅनर्जी यांनी शांततेचे आवाहन केले असले तरी बंगालमधील हिंसा अद्यापही थांबलेली नाही.

CPI (M) criticizes Bengal violence, Yechury says violence is reprehensible, Mamata Banerjee should focus on epidemic

महत्त्वाची बातमी