Jammu and Kashmir Former Governor Jagmohan Passed Away, PM Modi and Amit Shah expressed grief

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे निधन, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी व्यक्त केला शोक

Former Governor Jagmohan Passed Away : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन मल्होत्रा ​​यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित जगमोहन हे वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीही होते. जगमोहन हे लोकसभेतही निवडून आले होते. नगरविकास व पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. Jammu and Kashmir Former Governor Jagmohan Passed Away, PM Modi and Amit Shah expressed grief


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन मल्होत्रा ​​यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित जगमोहन हे वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीही होते. जगमोहन हे लोकसभेतही निवडून आले होते. नगरविकास व पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.

दोनदा जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून त्यांची निवड झाली. 1984 ते 1989 पर्यंत आणि पुन्हा जानेवारी 1990 ते मे 1990 पर्यंत ते या पदावर राहिले. जगमोहन यांना कॉंग्रेस सरकारने प्रथम 1984 मध्ये राज्यपाल म्हणून नियुक्त केले होते. पहिल्या कार्यकाळात ते जून 1989 पर्यंत राज्यपाल राहिले. त्यानंतर व्ही.पी.सिंग सरकारने त्यांना जानेवारी 1990 मध्ये पुन्हा राज्यपाल म्हणून नियुक्त केले. मे 1990 पर्यंत त्यांनी हे पद सांभाळले. जगमोहन मल्होत्रा ​​यांनी नंतर राजकारणात प्रवेश केला. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्रिपद भूषवले.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, जगमोहनजी यांच्या निधनामुळे देशाची मोठी हानी झाली आहे. ते एक अनुकरणीय प्रशासक आणि प्रसिद्ध विद्वान होते. त्यांनी नेहमीच भारताच्या उन्नतीसाठी काम केले. त्यांच्या कार्यकाळात नावीन्यपूर्ण धोरण तयार करण्यात आले. मी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल आणि चाहत्यांबद्दल शोक व्यक्त करतो.

गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून जगमोहनजींना त्यांच्या उल्लेखनीय कार्यकाळासाठी कायम स्मरणात ठेवले जाईल. एक सक्षम प्रशासक आणि नंतर एक समर्पित राजकारणी ज्याने देशाच्या शांतता आणि प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांच्या मृत्यूवर भारत शोक व्यक्त करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.

काश्मीर धगधगत असताना उचलली कठोर पावले

1927 मध्ये जन्मलेले जगमोहन हे दिल्लीचे उपराज्यपालही होते. आणीबाणीच्या काळात राजधानीच्या सौंदर्यीकरणाचे काम जगमोहन मल्होत्रा ​​यांच्यावर सोपविण्यात आले होते. काही काळ ते गोवा, दमण आणि दीवचे राज्यपालदेखील होते. नंतर 1984 ते 1989 पर्यंत अविभाजित जम्मू-काश्मीर राज्याचे राज्यपाल होते. त्या काळात त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये पसरलेल्या दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलली. राज्यपाल असताना जगमोहन यांनी काश्मीर खोऱ्यात अनेक कठोर निर्णय घेतले. दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईची रणनीतीही आखली. काश्मिरी पंडितांनीवरील अत्याचार रोखण्याचा प्रयत्न केला.
उल्लेखनीय बाब म्हणजे, 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 काढून भाजपने संपर्क मोहीम सुरू केली होती, तेव्हा अमित शहा आणि विद्यमान भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा शहा यांनी संपर्क मोहिमेची सुरुवात जगमोहन यांच्यासमवेत झालेल्या बैठकीने केली होती.

Jammu and Kashmir Former Governor Jagmohan Passed Away, PM Modi and Amit Shah expressed grief

महत्त्वाची बातमी