Corona Updates : मुंबईसह १२ जिल्ह्यांतील रुग्णसंख्येमध्ये घट, राज्यात ५९,५०० जणांना डीसचार्ज ; ४८ हजार जण बाधित

वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात कालच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट आढळली आहे. राज्यात 59 हजार 500 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 24 तासांत 48 हजार 621 नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. Corona Updates :Decline in the number of patients in 12 districts including Mumbaiमुंबईत रुग्णसंख्येत घट होत आहे. 2662 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 40 लाख 41 हजार 158 आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.7 टक्के आहे. राज्यात 567 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 47 लाख 71 हजार 22 वर पोचली आहे. राज्यात 39 लाख 8 हजार 491 जण होम क्वारंटाईन आहेत. तर 28 हजार 593 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्याच्या स्थितीत 6 लाख 56 हजार 870 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

12 जिल्ह्यांत दिलासादायक स्थिती

महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मुंबई व मुंबई उपनगरसह औरंगाबाद , भंडारा, धुळे, गोंदिया, जळगाव, लातूर, नांदेड, नंदुरबार, ठाणे, वाशिम या जिह्यांचा समावेश आहे. कोरोना लाटेत या जिह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत होती. मात्र आता रुग्णांच्या संख्येत घट दिसत आहे.

Corona Updates : Decline in the number of patients in 12 districts including Mumbai

महत्त्वाच्या बातम्या