फायझर भारताला देणार ५१० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत, प्रत्येक कोरोनाबाधिताला मिळणार मोफत औषधे

जागतिक पातळीवरील बडी फार्मा कंपनी असलेल्या फायझरने भारताला ५१० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत जाहीर केली आहे. फायझरच्या अमेरिका, युरोप आणि अशियातील वितरण केंद्रांवरून ही मदत भारतात पोहोचणार आहे. कोरोनाविरुध्दच्या लढाईत भारताला साथ देण्यासाठी ही मदत असल्याचे कंपनीचे अध्यक्ष अल्बर्ट बोरुला यांनी म्हटले आहे. भारतातील प्रत्येक कोरोनाबाधिताला फायझरची औषधे मोफत मिळणार आहेत. Pfizer to provide Rs 510 crore in medical aid to India, free medicine to each corona sufferer


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील बडी फार्मा कंपनी असलेल्या फायझरने भारताला ५१० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत जाहीर केली आहे. फायझरच्या अमेरिका, युरोप आणि अशियातील वितरण केंद्रांवरून ही मदत भारतात पोहोचणार आहे. कोरोनाविरुध्दच्या लढाईत भारताला साथ देण्यासाठी ही मदत असल्याचे कंपनीचे अध्यक्ष अल्बर्ट बोरुला यांनी म्हटले आहे. भारतातील प्रत्येक कोरोनाबाधिताला फायझरची औषधे मोफत मिळणार आहेत.फायझर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांना अल्बर्ट यांनी एक ई-मेल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतातील कोरोनाच्या गंभीर स्थितीमुळे खूप वेदना होत आहे. आम्ही अगदी ह्रदयापासून तुमच्यासोबत होतो. तुमच्या कुटुंबियांसोबत आणि भारताच्या सर्व लोकांसोबत आहोत. भारताच्या कोरोनाविरुध्दच्या लढ्यामध्ये आम्ही सोबत आहोत. त्यासाठी कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी वैद्यकीय मदत गोळा केली जात आहे. ही मदत लवकरच भारताला पाठवली जाईल. फायझरमधील सर्व सहकारी मदत गोळा करण्याच्या कामाला लागले आहेत.भारत सरकारने सांगितलेली सर्व प्रकारची वैद्यकीय मदत पुरविली जाईल.

भारतातील प्रत्येक रुग्णालयातील कोरोना बाधिताला फायझरचे औषध मोफत मिळेल, यासाठी आम्ही ही मदत करत आहोत. प्रत्येक रुग्णापर्यंत ही मदत पोहोचवली जाईल.
मदत सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही भारत सरकार आणि स्वयंसेवी संस्थांसोबत काम करत आहाते. सर्वाधिक गरज असलेल्या भागात ही मदत लवकरात लवकर पोहोचविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Pfizer to provide Rs 510 crore in medical aid to India, free medicine to each corona sufferer

महत्त्वाच्या बातम्या