महाराष्ट्राचा रेमडेसिवीरचा कोटा होणार दुप्पट, केंद्राकडून आठ लाख नऊ हजार कुप्या मिळणार


कोरोनाच्या कहरात जनतेला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी रेमडेसिविरचा कोटा जवळपास दुप्पट केला  आहे. त्यामुळे आता ८ लाख ९ हजार कुपी राज्याला मिळणार आहेत. कोरोनाच्या संकटात हा दिलासा ठरणार आहे.Maharashtra’s quota of Remedesivir will be doubled, eight lakh nine thousand kupas will be received from the Center


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या कहरात जनतेला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी रेमडेसिविरचा कोटा जवळपास दुप्पट केला  आहे. त्यामुळे आता ८ लाख ९ हजार कुपी राज्याला मिळणार आहेत. कोरोनाच्या संकटात हा दिलासा ठरणार आहे.

२१ ते ३० एप्रिल दरम्यान ४ लाख ३५ हजार रेमडेसिविर कुपी महाराष्ट्राला दिल्या जातील, असे केंद्र सरकारने कळविले होते. दहा दिवसांत सरासरी ४३ हजार कुपी मिळणे अपेक्षित होते. कोणत्या कंपन्यांनी किती कुपी पुरवायच्या आहेत,



याचा कोटाही केंद्र सरकारने निश्चित करून दिला होता. १ मे पर्यंत त्यातील ३ लाख ४९ हजार ७० कुपी मिळाल्या. केंद्र सरकारने राज्याला एक पत्र पाठवून आता एकूण ८ लाख ९ हजार कुपींचा ९ मे पर्यंत पुरवठा केला जाईल असे म्हटले आहे.

आतापर्यंत मिळालेल्या कुपींसह हा आकडा असेल.राज्यात रेमडेसिविरच्या गरजेच्या तुलनेत जवळपास ४० टक्के साठा कमी असल्याने प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.

दररोज ७० हजार रेमडेसिविरची गरज आहे. हेटेरो, सिप्ला या दोन कंपन्याकडून राज्याला रेमडेसिवीर पुरविले जात आहे. इतर पाच कंपन्यांनी पुरवठा वाढवावा यासाठी केंद्राकडून पाठपुरावा केला जात आहे.

Maharashtra’s quota of Remedesivir will be doubled, eight lakh nine thousand kupas will be received from the Center

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात