Bengal Election Results Out of 59 Muslim dominated seats, TMC won staggering 58 Seats

ममतांना मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान, ५९ मुस्लिमबहुल मतदारसंघांपैकी ५८ मध्ये तृणमूलचा विजय

Bengal Election Results : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. परंतु अवघ्या देशाचे लक्ष होते ते बंगालच्या निकालाकडे. येथे तृणमूल विरुद्ध भाजपमध्ये थेट संघर्ष होता. या निवडणुकीत बंगालच्या जनतेने तृणमूलच्या पारड्यात बहुमताचे दान टाकले आहे. ममतांच्या विजयाची अनेक कारणे सांगितली जात आहेत. त्यांनी भाजपविरुद्ध प्रचारासाठी आखलेली रणनीती, प्रत्येक मतदारसंघात पोहोचून ‘बंगाल की बेटी’ असल्याची घातलेली भावनिक साद, तसेच मुस्लिम मतदारांवर केलेले लक्ष इत्यादी अनेक कारणे आहेत. Bengal Election Results Out of 59 muslim dominated seats, TMC won staggering 58 Seats


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. परंतु अवघ्या देशाचे लक्ष होते ते बंगालच्या निकालाकडे. येथे तृणमूल विरुद्ध भाजपमध्ये थेट संघर्ष होता. या निवडणुकीत बंगालच्या जनतेने तृणमूलच्या पारड्यात बहुमताचे दान टाकले आहे. ममतांच्या विजयाची अनेक कारणे सांगितली जात आहेत. त्यांनी भाजपविरुद्ध प्रचारासाठी आखलेली रणनीती, प्रत्येक मतदारसंघात पोहोचून ‘बंगाल की बेटी’ असल्याची घातलेली भावनिक साद, तसेच मुस्लिम मतदारांवर केलेले लक्ष इत्यादी अनेक कारणे आहेत.

ममतांवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप सातत्याने होत आला आहे. या निवडणुकीतही तो झाला. यामुळे आपली प्रतिमा बदलण्यासाठी ममतांनीही चंडियाग केला. स्वत: ब्राह्मण हिंदू असल्याचा उल्लेख जाहीर सभांमधून केला, स्वत:चे शांडिल्य गोत्रही जगजाहीर केले. परंतु या निकालात त्यांच्यामागे मुस्लिम मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बंगालमध्ये ध्रुवीकरण जरूर झाले, परंतु मुस्लिमांची एकगठ्ठा मते ममतांना पडली, उलट हिंदू मतांची विभागणीच जास्त झाली.

मालदा-मुर्शिदाबादसारखे मुस्लिमबहुल मतदारसंघ जे काँग्रेसचे बालेकिल्ले होते, तेथे तृणमूलचा मोठा विजय झाल्याचे दिसून येते. मुस्लिमांना यावेळी ममतांनाच विजयी करायचे होते, हे यावरून दिसून येते. फक्त हे दोनच मतदारसंघ नाही, तर बंगालमधील एकूण 59 मुस्लिमबहुल मतदारसंघांपैकी 58 मध्ये तृणमूलचा मोठा विजय झाला आहे.

मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान हेही ममतांच्या या विजयामागचे मोठे कारण आहे. दुसरीकडे, ऐन निवडणुकीच्या आधी पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमतींचा फटका, भाजपला बसला. याशिवाय ममता नेहमीच मांडत आलेला मुद्दा म्हणजे बाहेरचे विरुद्ध आतले. ममता सातत्याने म्हणत राहिल्या की, बाहेरचे लोक कधीही बंगालची संस्कृती समजू शकणार नाहीत. याचाही मतदारांवर परिणाम झाला आहे.

बंगालमध्ये जवळजवळ 30 टक्के मुस्लिम मतदार आहेत. ते यावेळीही निर्णायक ठरले. मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनाजपूर, बीरभूम, दक्षिण 24 परगणा आणि कूचबिहार असे जिल्हे आहेत, जेथे मुस्लिमांची मोठी लोकसंख्या आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार, मुर्शिदाबादमध्ये तर 66.2 टक्के लोकसंख्या मुस्लिमांची आहे. तर मालदामध्ये हेच प्रमाण 51.3 टक्के आहे. उत्तर दिनाजपूरमध्येही 50 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. बीरभूममध्ये 37 टक्के, दक्षिण 24 परगनामध्ये 35.6 टक्के आणि कूचबिहारमध्ये 25.54 टक्के लोकसंख्या मुस्लिमांची आहे.

बंगालच्या तब्बल 125 विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदार निर्णायक ठरत आले आहेत. राजकीय तज्ज्ञांच्या मते, ज्या पक्षाकडे मुस्लिम मतदारांचा कल असतो, बंगालमध्ये त्यांचेच सरकार बनते. आतापर्यंतचा रेकॉर्ड असा आहे की, मुस्लिमांनी कोणत्याही एकाच पक्षाला मतदान केलेले नाही, परंतु यावेळी पहिल्यांदा मुस्लिम मतदार तृणमूलसोबत मजबूतीने उभा असलेला दिसला. यापूर्वी मुस्लिम मतदार हे तृणमूलसोबतच काँग्रेस आणि डाव्यांमध्ये विभागलेले होते.

Bengal Election Results Out of 59 Muslim dominated seats, TMC won staggering 58 Seats

महत्त्वाच्या बातम्या