Padma Shri Manas Bihari Varma passed away in Bihar

भारताचे पहिले लढाऊ विमान सुपरसॉनिक ‘तेजस’ची निर्मिती करणाऱ्या पद्मश्री मानस बिहारींचे निधन, कलामांसोबतही केले होते काम

Padma Shri Manas Bihari Varma passed away : देशातील पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान ‘तेजस’च्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे पद्मश्री डॉ. मानस बिहारी वर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दरभंगाच्या लहेरियासराय येथील निवासस्थानी सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. वर्मा हे डीआरडीओ, बंगळुरूचे संरक्षण वैज्ञानिक, तसेच दिवंगत माजी राष्ट्रपती कलाम यांचे सहकारीही होते. Padma Shri Manas Bihari Varma passed away in Bihar


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान ‘तेजस’च्या (SuperSonic Tejas) निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे पद्मश्री डॉ. मानस बिहारी वर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दरभंगाच्या लहेरियासराय येथील निवासस्थानी सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. वर्मा हे डीआरडीओ, बंगळुरूचे संरक्षण वैज्ञानिक, तसेच दिवंगत माजी राष्ट्रपती कलाम यांचे सहकारीही होते.

‘तेजस’च्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास लहरियारासराईच्या केएम टँक निवासस्थानही हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. डॉ. वर्मा यांचे पुतणे मुकुल बिहारी वर्मा यांनी याला दुजोरा दिला आहे. डॉ. वर्मा हे मूळचे घनश्यामपूर ब्लॉकमधील बाऊर गावचे रहिवासी होते. सध्या ते केएम टँक मोहल्ला येथे किरायाच्या घरात राहत होते. डॉ. वर्मा बंगळुरूच्या डीआरडीओ येथे संरक्षण वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती एपीजे डॉ. अब्दुल कलाम यांचे सहायक होते. ‘तेजस’ या लढाऊ विमानांच्या निर्मितीत डॉ. वर्मा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते अविवाहित होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच केएम टँक येथील त्यांच्या निवासस्थानावर मोठ्या संख्येने लोक दाखल होऊ लागले. बौर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

बालपण..

डॉ. मानस वर्मा यांचा जन्म 29 जुलै 1943 रोजी दरभंगा जिल्ह्यातील घनश्यामपुर ब्लॉकमधील बाऊर या छोट्याशा गावात झाला. येथे जवळपास दरवर्षी पूर यायचा. डॉ. वर्मा यांना चार बहिणी आणि तीन भाऊ होते. बालपणी त्यांची चुणूक पाहून पालकांनी त्यांना ऋषी म्हणायला सुरवात केली. प्रसिद्ध मैथिली साहित्यिक ब्रजकिशोर वर्मा मणिपद्म यांच्या कुटुंबातील असल्याने त्यांना योग्य शैक्षणिक वातावरण बालपणापासूनच लाभले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यांनी मधेपूर येथून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी पाटणा सायन्स कॉलेज, बिहार अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सागर विद्यापीठातून उच्च आणि तांत्रिक शिक्षण घेतले.

निवृत्तीपासून गावातच वास्तव्य

डॉ. वर्मा यांना डझनभर पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते डीआरडीओच्या ‘सायंटिस्ट ऑफ दी इयर’ आणि ‘टेक्नॉलॉजी लीडरशिप अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले होते. 2018 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. वर्मा निवृत्तीनंतर 2005 पासून आपल्या बाऊर गावात राहत होते. अखेरपर्यंत ते वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांमार्फत मुले आणि शिक्षकांमध्ये विज्ञानाचा प्रसार करण्याचे कार्य करत राहिले.

Padma Shri Manas Bihari Varma passed away in Bihar

महत्त्वाची बातमी