शब्द जपून वापरण्यासाठी सर्व पक्षांनी विचार करावा; भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन


विशेशे प्रतिनिधी

मुंबई : राणे साहेब बोलले म्हणून राडा करायचा आणि राज्यपालांना निर्लज्ज म्हंटल्यानंतर ती एक शैली आहे असं म्हणायचं..? असे कसे काय चालेल. आता सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्तिगत टिप्पणी करताना भान ठेवले पाहिजे, असे मत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. Use words carefully, All parties should consider

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विधानावरून राज्यात काल रणकंदन माजले. राजकारणात एकमेकांनावर टिप्पणी करताना अपशब्द वापरण्याचे असे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले आहेत. ते थांबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राजकीय मतभेद जरूर असतील पण, मनभेद वाढू नयेत, याची काळजी घ्यायला पाहिजे.

सर्वच राजकीय पक्षांनी आता एकत्र बसून असे प्रकार होणार नाहीत, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन यावर तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले.

  •  शब्द आणि बाण एकदा सुटला की सुटला
  •  शब्दांचा वापर विचारपूर्वक करण्याचे आवाहन
  •  कोण म्हणतो कोरोनाचे जंतू तोंडात सोडतो
  • कोण म्हणतो राज्यपाल म्हातारे झाले आहेत
  •  जाहीर सभेत थोबाड फोडा, असे सांगितले जाते
  •  राजकारण हा अपशब्दांचा आखाडा झाला आहे
  •  सर्वच पक्षांनी आता एकत्र बसून विचार करावा
  •  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता पुढाकार घ्यावा

Use words carefully, All parties should consider

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”