दिल्लीच्या सिंहासनाला जबरदस्त हादरे बसायला सुरूवात झालीय… मोदींचे साऊथ ब्लॉकमधले आसन डळमळलेय… आता ते त्या आसनावरून कोलमडतायत की काय… अशी भीती निर्माण झालीय… ७ लोककल्याण मार्गावर गाशा गुंडाळायला एव्हाना सुरूवात झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे… sharad pawar initiates third front but of single digit parties
देशाच्या राजधानीत घडतेयच आहे तसे… दस्तुरखुद्द मोदींचे दस्तुरखुद्द राजकीय गुरू… ज्यांचे बोट धरून मोदी राजकारणात आले ते पवार दिल्लीत डेरेदाखल झाल्यावर दुसरे काय होणार… दिल्लीच्या सिंहासनाला हादरे बसणारच ना… सिंहासन डळमळणारच ना… तसेच झाले आहे…
मोदींच्या गुरूंनी दिल्लीत रणनीतीकारांबरोबर चर्चा केलीय… आणि त्यांनी लगोलग निर्णय घेऊन टाकलाय… आता मोदींना पर्यायी नेतृत्व काढायचेय… बस्स झाली आपल्या शिष्योत्तमाची नाटके… त्याला आता दिल्लीच्या सिंहासनावरून उतरवायचा म्हणजे उतरवायचाच… यासाठी त्यांनी रणनीतीकारांच्या मदतीने एक अत्यंत महत्त्वाचा दूरगामी, दूरदर्शी, दूरकेंद्री निर्णय घेऊन टाकला… विदेशी नेतृत्वाच्या काँग्रेसला वगळून सर्वच्या सर्व म्हणजे अगदी सर्वच्या सर्व विरोधी पक्षांना (सिंगल डिजिट पार्ट्यांना) बैठकीला एकत्र बोलवून २ वरून ३०३ वर पोहोचलेल्या मोदींच्या पार्टीला जबरदस्त आव्हान निर्माण करायचे म्हणजे करायचेच… त्यासाठी भले मग आपल्याला दुसऱ्या कुणी तरी तयार केलेल्या राष्ट्रमंचाच्या व्यासपीठावर जावे लागले तरी चालेल.
ही नीती आहे रणनीतीकारांची… आणि अंमलबजावणी आहे… मोदींच्या गुरूंची… म्हणजे ती यशस्वी होणारच… होणार म्हणजे काय होणारच… मग उद्या ४ वाजताच्या बैठकीला बोलावलेल्या सगळ्या पार्ट्या लोकसभेत भले सिंगल डिजिट्या का असेनात… या सगळ्या सिंगल डिजिट वाल्यांनी एकत्र येऊन मोदींच्या तीन डिजिटवाल्या पार्टीला आव्हान दिले की झाले… त्यांची पार्टी मोडीत निघालीच म्हणून समजा… तिला मोडीत निघण्याशिवाय पर्याय नाहीए… कारण मोदींच्या गुरूंनी पुढाकार घेतलाय… त्यापुढे मोदींना आणि पर्यायाने त्यांच्या पार्टीला मान तर तुकवावी लागेल ना…
पण दिल्लीतल्या काही पक्षांना आणि नतद्रष्ट पत्रकारांना हे बघवत नाही. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षांनी म्हणे मोदींच्या गुरूंच्या बैठकीला राजकीय फाऊल करण्यासाठी २४ तारखेला काँग्रेसच्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. आपल्याला वगळून मोदींचे गुरू विरोधी पक्षांची बैठक घेत आहेत, याचा १० जनपथला संताप आलाय. त्यामुळे मोदींचे काय व्हायचे ते होवो…
…पण मोदींच्या गुरूंचा हा राष्ट्रमंच उभा राहण्यापूर्वीच त्याचे बांबू काढून घ्यायची तयारी १० जनपथमध्ये चालू आहे म्हणे… दिल्लीतल्या काही नतद्रष्टांनी ही बातमी दिलीय… पण ती खरी नसावी. कारण रणनीतीकार आणि मोदींचे गुरू यांच्या विरोधातल्या दिल्लीतून निघालेल्या बातम्या मराठी पत्रकार तरी खऱ्या मानत नाहीत…!!
शेवटी मोदींच्या ३ डिजिट्या पार्टीपेक्षा आणि १० जनपथच्या २ डिजिट्या पार्टीपेक्षा या मोदींच्या गुरूंची सिंगल डिजिट पार्टी कितीतरी ताकदवान आहे नाही…!! शिवाय ते सगळ्या सिंगल डिजिट्यांची मोट बांधताहेत, ही बाब वेगळीच…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App