विशेष प्रतिनिधी
कोलकाता: स्वातंत्र्यलढ्यात संशयास्पद भूमिका, हे स्वातंत्र्य खोटे असल्याचे म्हणत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास विरोध करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने स्थापनेनंतर प्रथमच १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन साजर केला. मात्र, तिरंगा चुकीच्या पध्दतीने फडकाविला. Opposing the Independence Day celebrations, the Communist Party celebrated Independence Day for the first time since its inception, but unfurled the tricolor in the wrong way.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची (मार्क्सवादी) 1964 मध्ये स्थापना झाली.मात्र या पक्षाने कधीही पक्षीय पातळीवर स्वातंत्र्यदिन साजरा केला नव्हता. मात्र, यंदाच्या वर्षी प्रथमच भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) पक्ष कार्यालयांवर तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा केला.
भारतातील कम्युस्टिांची प्रथमपासून भूमिका होती की हे स्वातंत्र्य खोटे आहे. स्वातंत्र्यलढ्यातही त्यांची भूमिका संशयास्पद राहिली होती. रशिया आणि इंग्लंड दुसºया महायुध्दात मित्रराष्ट्र असल्याने १९४२ च्या लढ्यात त्यांनी सहभाग घेतला नव्हता. सुमारे ७० वर्षांपासून त्यांची हिच भूमिका राहिली होती. १९६४ मध्य्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाल्यावरही त्यांचे हेच मानणे होते.
Commies! Hoisted the Indian flag for the first time at their party HQ, and got it wrong! pic.twitter.com/KnayRXxFuS — Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) August 15, 2021
Commies! Hoisted the Indian flag for the first time at their party HQ, and got it wrong! pic.twitter.com/KnayRXxFuS
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) August 15, 2021
मात्र, पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा दारुण पराभव झाला. एकेकाळी सत्ताधारी असलेल्या या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे आपल्या धोरणांवर आणि विचारसरणीवर पुर्नविचार करण्याची वेळ कम्युनिस्टांवर आली. जनतेने दिलेल्या झटक्यामुळे यंदाच्या वर्षी स्वातंत्र्य दिन भव्य पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) केंद्रीय समितीने (पॉलिट ब्युरो) घेतला होता
पक्षाच्या राष्ट्रवादी भूमिकेवरच संशय घेण्यात येत होता. कम्युनिस्ट पक्षाचे डोळे नेहमी चीनकडे लागलेले असतात. १९६२ च्या चीन युध्दालाही कम्युनिस्टांनी लोकयुध्द असे म्हटले होते. त्याचबरोबर क्युबा, व्हिएतनाम येथील संघर्षाबाबतही त्यांची भूमिका भारतविरोधी राहिली होती. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन ठेवताना स्वांतत्र्यलढ्यात योगदान नव्हते असा आरोप होत आहे. त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन भव्य प्रमाणात साजरा करून कम्युनिस्ट पक्षाने आपल्यावरील आरोप पुसण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App