75th Independence Day : 15 ऑगस्ट 2021 रोजी भारत आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. ब्रिटिश राजवटीपासून मुक्तता होण्याचा दिवस प्रत्येक भारतीय अभिमानाने साजरा करतो. भारतीय स्वातंत्र्य चळवळ मोहनदास करमचंद गांधी यांच्या नेतृत्वात पहिल्या महायुद्धादरम्यान सुरू झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि जवळजवळ 200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीचा अंत झाला. 75th Independence Day Know About Indias Independence Importance And Rare Facts
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 15 ऑगस्ट 2021 रोजी भारत आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. ब्रिटिश राजवटीपासून मुक्तता होण्याचा दिवस प्रत्येक भारतीय अभिमानाने साजरा करतो. भारतीय स्वातंत्र्य चळवळ मोहनदास करमचंद गांधी यांच्या नेतृत्वात पहिल्या महायुद्धादरम्यान सुरू झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि जवळजवळ 200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीचा अंत झाला.
भारतीय स्वातंत्र्य विधेयक 4 जुलै 1947 रोजी ब्रिटीश हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सादर करण्यात आले आणि ते पंधरवड्यात पास झाले. यात 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतातील ब्रिटिश राजवटीच्या समाप्तीची तरतूद करण्यात आली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या वेदनादायी विभाजनानंतर भारत एक स्वतंत्र देश बनला.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महान स्वातंत्र्यसैनिकांमध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस आणि अशीच असंख्य महापुरुषांची नावे आहेत.
भारताचा स्वातंत्र्य दिन महत्त्वाचा आहे, कारण हा दिवस ब्रिटिश गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या त्यागाची आठवण करून देत असतो. या दिवशी एक राष्ट्रीय सुटी असते. यासोबतच झेंडावंदन, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपूर्ण देशभरात साजरे केले जातात. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 14 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकावला. ही परंपरा त्यांच्यानंतरच्या प्रत्येक पंतप्रधानांनी पाळली आहे, त्यानंतर ते देशाला संबोधित करतात.
1. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये रचलेल्या ‘भारत भाग्य विधाता’ या गाण्याचे नाव ‘जन गण मन’ असे ठेवण्यात आले आणि 24 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान सभेने हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले.
2. लाल, पिवळा आणि हिरव्या तीन आडव्या पट्ट्या असलेला भारतीय राष्ट्रध्वज 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकाताच्या पारसी बागान स्क्वेअरवर फडकवण्यात आला होता. भारताच्या सध्याच्या राष्ट्रध्वजाचे पहिले रूप 1921 मध्ये स्वातंत्र्य सेनानी पिंगली वेंकया यांनी डिझाइन केले होते. भगवा, पांढरा आणि हिरवा रंग आणि मध्यभागी अशोक चक्र असलेला वर्तमान ध्वज अधिकृतपणे 22 जुलै 1947 रोजी स्वीकारण्यात आला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी फडकावण्यात आला.
3. भारतासह इतर पाच देश 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरे करतात. बहरीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया आणि लिकटेंस्टाईन यांचा या देशांमध्ये समावेश आहे.
4. भारतीय ध्वज देशात फक्त एकाच ठिकाणाहून तयार केला जातो आणि पुरवला जातो. कर्नाटकातील धारवाड येथे असलेल्या कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाला (केकेजीएसएस) भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे उत्पादन आणि पुरवठा करण्याचा अधिकार आहे. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) नुसार, ध्वज केवळ हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या कापूस खादीपासून तयार केला जातो.
5. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही गोवा काही काळ पोर्तुगीज वसाहत होती. भारतीय लष्कराने गोव्याला 1961 मध्ये भारताशी जोडले. अशा प्रकारे गोवा हे भारतीय प्रदेशात सामील होणारे अखेरचे राज्य होते.
75th Independence Day Know About Indias Independence Importance And Rare Facts
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App