सौर, पवन ऊर्जेच्या क्षमतेत भारत जगात चौथ्या क्रमांकावर, १ लाख मेगावॅटचा टप्पा ओलांडला

Renewable Energy Installed Capacity In The Country Crosses One Lakh Mw

Renewable Energy : रिन्युएबल एनर्जीच्या क्षेत्रात देशाने गुरुवारी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. अक्षय ऊर्जेची स्थापित निर्मिती क्षमतेने एक लाख मेगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. यासह भारत अक्षय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. एका अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली. 2022 पर्यंत देशाने 1,75,000 मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता गाठण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. Renewable Energy Installed Capacity In The Country Crosses One Lakh Mw


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रिन्युएबल एनर्जीच्या क्षेत्रात देशाने गुरुवारी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. अक्षय ऊर्जेची स्थापित निर्मिती क्षमतेने एक लाख मेगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. यासह भारत अक्षय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. एका अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली. 2022 पर्यंत देशाने 1,75,000 मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता गाठण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, “प्रमुख जलविद्युत प्रकल्प वगळता देशातील एकूण स्थापित अक्षय ऊर्जा क्षमता एक लाख मेगावॅट झाली आहे. रिन्युएबल एनर्जीच्या स्थापित क्षमतेच्या बाबतीत भारत आज जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सौर ऊर्जेमध्ये स्थापित क्षमतेच्या बाबतीत भारताचा जगात पाचवा आणि पवन ऊर्जेच्या बाबतीत चौथा क्रमांक आहे.

ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी ट्विटरवर लिहिले, “देशातील वीज क्षेत्रातील आणखी एक ऐतिहासिक दिवस. आमची स्थापित अक्षय ऊर्जा क्षमता (मोठे जलविद्युत प्रकल्प वगळता) एक लाख मेगावॅट ओलांडली आहे…”

निवेदनात म्हटले आहे की, देशात अक्षय ऊर्जेची एकूण स्थापित क्षमता एक लाख मेगावॅटपर्यंत पोहोचली असताना, 50,000 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प निर्माणाधीन आहेत. तर 27,0000 मेगावॅट निविदा प्रक्रियेत आहे. मोठ्या जलविद्युत प्रकल्पांचा समावेश केल्यास स्थापित अक्षय ऊर्जा क्षमता 1,46,000 मेगावॅटपर्यंत वाढेल.

देशाने 2030 पर्यंत अक्षय ऊर्जा क्षेत्रात 4,50,000 मेगावॅट क्षमतेची स्थापना करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Renewable Energy Installed Capacity In The Country Crosses One Lakh Mw

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात