World Youth Championships : पोलंडमध्ये भारतीय तिरंदाजांनी फडकावला तिरंगा, महिला संघापाठोपाठ पुरुष संघानेही जिंकले सुवर्ण

India Cadet Compound Girls and boys team Wins Gold In Archery World Youth Championships in poland

World Youth Championships : पोलंडमध्ये सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय अंडर -18 महिला तिरंदाजांनी शनिवारी इतिहास रचला. महिला कंपाऊंड संघाने तुर्कीचा पराभव करत सुवर्णपदकावर दावा केला. प्रिया गुर्जर, प्रनीत कौर आणि रिधू वर्शीनी सेंथिलकुमार या त्रिकुटाने अंतिम फेरीत तुर्कीचा 228-216 असा पराभव केला. India Cadet Compound Girls and boys team Wins Gold In Archery World Youth Championships in poland


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पोलंडमध्ये सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय अंडर -18 महिला तिरंदाजांनी शनिवारी इतिहास रचला. महिला कंपाऊंड संघाने तुर्कीचा पराभव करत सुवर्णपदकावर दावा केला. प्रिया गुर्जर, प्रनीत कौर आणि रिधू वर्शीनी सेंथिलकुमार या त्रिकुटाने अंतिम फेरीत तुर्कीचा 228-216 असा पराभव केला.

चार दिवसापूर्वी म्हणजे 10 ऑगस्ट रोजी प्रिया गुर्जर, प्रनीत कौर आणि रिधु वर्शीनी सेंथिलकुमार या त्रिकुटाने कॅडेट कंपाउंड महिला संघ स्पर्धेत 2160 पैकी 2067 गुण मिळवत अव्वल स्थानावर राहिले होते. भारतीय खेळाडूंचा हा स्कोअर जागतिक विक्रमापेक्षा 22 गुणांनी अधिक आहे. यापूर्वी अमेरिकन संघाने 2045 गुण मिळवले होते. याशिवाय, कंपाऊंड कॅडेट मिश्रित संघ स्पर्धेतही प्रिया आणि कुशल दलाल जोडीने 1401 गुणांसह विश्वविक्रम केला आणि अव्वल स्थानावर राहिले.

पुरुष संघाचीही गोल्डन कामगिरी

महिलांनंतर पुरुषांच्या कंपाऊंड संघानेही सुवर्ण लक्ष्य गाठले. साहिल चौधरी, मिहीर नितीन आणि कुशल दलाल या त्रिकुटाने अंतिम फेरीत अमेरिकेचा 233-231 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

India Cadet Compound Girls and boys team Wins Gold In Archery World Youth Championships in poland

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात