केमचं रुसलेलं कुंकू पुन्हा हसणार ! ; मंदिरे खुली होणार; २२ कारखान्यांना नवसंजीवनी

 

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : कोरोना संसर्गामुळे दोन वर्षापासून महाराष्ट्रातील सर्वच धार्मिक स्थळ कुलूपबंद आहेत.  यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध केमची कुंकवाची कारखानदारी संकटात सापडली होती. Kem’s kumkum will laugh again! ; The temples will be open; Revival of 22 factories

यामुळे तब्बल ४०० कामगारांवर बेकरीची कुऱ्हाड कोसळली होती. आता मंदिरे उद्यापासून घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर खुली होणार आहे. आता व्यवसायाला सुरुवात होत आहे. त्यामुळे केमचं रुसलेलं कुंकू पुन्हा हसणार आहे.
सौभाग्याच लेणं म्हणून कुंकवाला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे.

सोलापूर जिल्ह्यातील केममध्ये कुंकवाचे २२ कारखाने आहेत. कोरोना संसर्गामुळे कारखाने बंद होते.त्यामुळे कामगारांच्या रोजीरोटीवर प्रश्ननिर्माण झाला होता.

दर्जेदार मालामुळे सिझनमध्ये केममधून ८०० मेट्रिक टन गुलाल अन् कुंकू निर्यात केला जात होते. देवदेवतांच्या यात्रा उत्सवात कुंकू, गुलाल, बुक्का वापरण्याची हजारो वर्षांची परंपरा आहे. ती खंडित झाली होती.
कोरोनामुळे पंढरपूरची वारी,तुळजापूर – कोल्हापूरचा नवरात्रोत्सव, खंडोबा – ज्योतिबाच्या यात्रा, खेडोपाडी गावोगावचे उरूस, जत्रा, यात्रा, गणपती या सर्वांवर निर्बंध आल्याने कुंकवाचे कारखाने ठप्प झाले होते.

केमची कुंकवाची कारखानदारी संकटात होती
– सोलापूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध कारखानदारी
– कुंकवाचे तब्बल २२ कारखाने या भागात
– कोरोनाने सौभाग्य लेण्याचा बाजार होता ठप्प
– ४०० कामगारांवर आली होती उपासमारीची वेळ
— घटस्थापनेला मंदिरे खुली होणार असल्याने दिलासा

Kem’s kumkum will laugh again! ; The temples will be open; Revival of 22 factories

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात