पर्यावरणाचा विचार करायला गेला अन् १५ लाखांच्या हिऱ्याची अंगठी देऊनही मैत्रिणीला गमावून बसला


पर्यावरणाचा विचार करायला गेला आणि पंधरा लाख रुपये खर्च करूनही मैत्रिणीला खुश करता आले नाही. कारण त्याने मैत्रिणीशी साखरपुडा करण्यासाठी १४ हजार पौंडांची म्हणजे सुमारे १५ लाख रुपयांची अंगठी घेतली होती. परंतु, या हिऱ्याच्या अंगठीतील हिरा हा अस्सल नाही तर प्रयोगशाळेत बनविला आहे हे समजल्यावर तिला राग आला व ती आई-वडिलांकडे राहू लागली. He went to think about the environment and lost his girlfriend even after giving her a diamond ring worth Rs 15 lakh


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पर्यावरणाचा विचार करायला गेला आणि पंधरा लाख रुपये खर्च करूनही मैत्रिणीला खुश करता आले नाही. कारण त्याने मैत्रिणीशी साखरपुडा करण्यासाठी १४ हजार पौंडांची म्हणजे सुमारे १५ लाख रुपयांची अंगठी घेतली होती. परंतु, या हिऱ्याच्या अंगठीतील हिरा हा अस्सल नाही तर प्रयोगशाळेत बनविला आहे हे समजल्यावर तिला राग आला व ती आई-वडिलांकडे राहू लागली.

इंग्लंडमधील एका तरुणाने सोशल मीडियावर लिहिले आहे की, मी मैत्रिणीला १५ लाख रुपयांची अंगठी भेट दिली तर मी काय चूक केली? मी माज्या मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी अंगठी भेट दिली होती. अंगठीतील हिरा अस्सल नसून प्रयोगशाळेत बनवलेला आहे. मी या अंगठीवर एवढा पैसा खर्च केला हे ऐकून तिला आधी धक्का बसला.



एवढ्या पैशात मी ३.६ कॅरेटचा एवढा मोठा हिरा कसा विकत घेऊ शकलो याची तिला शंकाही येऊ लागली. त्यानंतर मैत्रिणीने मला म्हटले की, तिला त्या अंगठीसोबत मिळालेले डायमंड सर्टिफिकेट बघायचे आहे. ती जास्तच विचारपूस करीत आहे, असे दिसल्यावर मी तिला सांगितले की, तो हिरा अस्सल नाही तर प्रयोगशाळेत बनवलेला आहे.

पर्यावरणाची हानी होते म्हणून मी अस्सल हिरा विकत घेतला नाही. हे ऐकून मैत्रीण खूपच नाराज झाली. मी तिच्यासाठी अस्सल हिरा आणला नाही हे सांगून ती तिच्या पालकांकडे राहायला निघून गेली, अशी खंत त्याने व्यक्त केली आहे.

He went to think about the environment and lost his girlfriend even after giving her a diamond ring worth Rs 15 lakh

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात