जिसका कोई नही, उसका तो ‘जगन रेड्डी’ है यारो


कोरोनाच्या संकटानंतर देशातल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी काढायची झाली तर आंध्र प्रदेशचे तरुण मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांचा क्रमांक सर्वात वर येण्याची चिन्हे आहेत. कोरोना संकटामुळे संपूर्ण जगाचे अर्थकारण बिघडलेले असताना जगन मोहन यांनी मात्र आंध्र प्रदेशाची तिजोरी जनतेसाठी खुली केली आहे. कोरोना संकटाचा भार हलका करण्यासाठी आर्थिक मदतीच्या एकामागून एक मोठ्या घोषणा ते करत आहेत. जगन मोहन यांना प्रचंड सहानुभूती मिळवून देणारी एक घोषणा त्यांनी काही तासांपूर्वीच केली. Andhra Chief Minister YS Jagan Mohan Reddy to set fixed deposit account of RS 10 lakh in the name of every child who lost both parents to Covid-19


वृत्तसंस्था

हैद्राबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी मोठी घोषणा केली. कोरोनाने आई आणि वडिल या दोघांचेही मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या प्रत्येक मुलाच्या नावे दहा लाख रुपयांची मुदत ठेव (एफडी) ठेवण्याचा निर्णय जगन मोहन यांनी घेतला.

कोरोनाच्या संकटात अनाथ झालेल्या आंध्रातल्या प्रत्येक बालक-बालिकेला या योजनेत सहभागी करुन घेतले जाणार आहे. अनाथ मूल पंचवीस वर्षाचे होईपर्यंत त्याला या एफडीतून दरमहा निश्चित असे उत्पन्न दिले जाणार आहे.



या योजनेसाठीचे पँकेज तयार करण्याचे आदेश जगन मोहन रेड्डी यांनी सरकारी वरीष्ठ अधिकारी आणि बँकांना दिले आहेत. अनाथ मुलांच्या एफडीसाठी जास्तीत जास्त चांगला व्याज दर देण्याची सूचनाही त्यांनी बँकांना केली आहे.

ज्या मुलांचे दोन्ही पालक (आई-वडील) कोरोनाग्रस्त झाल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशा मुलांसाठी देखभाल संस्था स्थापन करण्याचा निर्णयही आंध्रच्या मुख्यमंत्र्यांनी नुकताच घेतला होता.

या संस्थांमध्ये कोरोनाबळी ठरलेल्या माता-पित्यांच्या अनाथ मुलांनाही सहभागी करुन घेतले जाणार आहे. या ठिकाणी या मुलांसाठी भोजन, निवास आणि कपडेलत्त्याची सोय करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे देशात पहिल्यांदाच आंध्र प्रदेश सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यंसंस्कारांसाठी संबंधितांच्या कुटुंबियांना पंधरा हजार रुपये देण्याचाही निर्णय घेतला. राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांना हे पैसे वितरीत करण्याची सूचना देण्यात आली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्य सचिव अनिल कुमाल सिंघल यांची या आदेशावर स्वाक्षरी आहे. कोरोना परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी निर्माण केलेल्या निधीतून अंत्यसंस्कारासाठीचा खर्च दिला जावा, असे या आदेशात म्हटले आहे.

ताज्या आकडेवारीनुसार आंध्रप्रदेशात रविवारी 24 हजार 171 नव्या कोरोनारुग्णांची भर पडली. आंध्र प्रदेशसाठी एका दिवसातील ही सर्वात मोठी रुग्णसंख्या ठरली. आत्तापर्यंत आंध्रात 2 लाख 7 हजार सक्रीय कोरोनारुग्ण आहेत.

तर रविवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 101 नोंदली गेली. गेल्यावर्षी कोरोना महामारीचा संसर्ग सुरु झाल्यापासून आंध्र प्रदेशात एकूण 9 हजार 372 कोरोनाबळी गेले आहेत. तर आजवरची कोरोनाबाधितांची एकूण संख्या 14 लाख 35 हजार 491 आहे.

Andhra Chief Minister YS Jagan Mohan Reddy to set fixed deposit account of RS 10 lakh in the name of every child who lost both parents to Covid-19

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात