सलमान खुर्शीदांचा Think Big चा सल्ला काँग्रेस नेतृत्वाच्या पचनी पडेल??; की भाजपची तरफदारी त्यांच्यावरचा संशय वाढवेल??


विनायक ढेरे

नाशिक – बऱ्याच महिन्यांनी सक्रीय होत सलमान खुर्शीद यांनी आज जणू राजकीय विजनवासातून बाहेर येत काँग्रेस नेत़ृत्वाला “न मागताच सल्ला” दिला आहे. पण त्याचवेळी त्यांनी भाजप नेतृत्वाची तरफदारी करून काँग्रेस नेतृत्वाची पंचाइत करून ठेवली आहे. आता त्यांचा (Think Big) म्हणजे भव्य दिव्य विचार करा, हा सल्ला ऐकला, तर भाजप नेतृत्वाचे अनुकरण केल्याचा आरोप येणार. आणि नाही ऐकला तर काँग्रेसचे नेतृत्व ज्येष्ठांचा सल्ला मानत नाही, असा वारंवार करून घिसापिटा झालेला आरोप सहन करावा लागणार. will congress leadership accept political suggestion of salman khurshid??

पण काँग्रेसची सध्याची स्थिती लक्षात घेता आणि स्वतः सोनिया गांधी राजकीयदृष्ट्या सक्रीय झालेल्या असताना वर लिहिलेला दुसरा आरोप सहन करणे त्यांना अधिक सोपे जाणारे असावे. कारण भाजप नेत्यांचे अनुकरण काँग्रेस नेतृत्वाने केले हा आरोप काँग्रेससाठी संघटना आणि वैचारिक पातळीवर परवडणारा नाही.



 

सलमान खुर्शीद यांच्या “न मागता दिलेल्या सल्ल्याची” “राजकीय मेख” यामध्येच तर दडलेली नाही ना, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. एकतर सलमान खुर्शीद बरेच महिने नेमके कुठे होते, हे कुणालाच माहिती नाही. ते आज अचानक एकदम उठतात आणि पीटीआयला खास मुलाखत देऊन थेट काँग्रेस नेतृत्वाला सल्ला देतात, तो देखील न मागता… हे नुसते राजकीय अजब नाही तर राजकीय संशय वाढविणारे आहे.

एकतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या सक्रीय झालेल्या आहेत. त्यांनी यूपीए अध्यक्षपद आपल्याकडून दुसऱ्या नेत्याकडे म्हणजे ममता बॅनर्जींकडे जाऊ नये, यासाठी मोर्चेबांधणी केल्याचे बोलले जाते आहे. त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीची दीर्घकाळानंतर बैठक देखील घेतली आहे. काँग्रेस संघटनेवर गांधी परिवाराची मजबूत पकड आहेच. ती आणखी घट्ट कऱण्यासाठी सोनियांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक देखील कार्यकारिणीमार्फत पुढे ढकलण्याची चतुर चाल खेळून घेतली आहे.

अशा स्थितीत सलमान खुर्शीद यांचा “न मागता देण्यात आलेला सल्ला” आला आहे. सोनियांच्या नेतृत्वावर एक प्रकारे निराशेचा किंवा नकारात्मकतेचा शिक्का मारण्याचाच हा प्रकार काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात मानला गेला नाही, तरच ते नवल ठरणार आहे. एकतर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत कोणीही तसा निराशेचा किंवा नकारात्मकतेचा सूर काढलेला नाही. मग सोनियांच्या नेतृत्वाला फाऊल करण्यासाठी हा सल्ला देण्यात आला आहे का…?? शक्यता नाकारता येत नाही.

जी – २३ नेत्यांचे म्होरके गुलामनबी आझादांना कोविड टास्क फोर्सचे नेतृत्व देऊन त्यांना काँग्रेसच्या संघटनात्मक कामात पुन्हा सामावून घेण्यात आले आहे. ही तर सलमान खुर्शीद यांची पोटदुखी नसेल… “न मागता दिलेला सल्ला” या पोटदुखीतून तर आलेला नसेल… सांगता येत नाही. ही काँग्रेस आहे, तिचे नेते कोणत्या दिशेला धनुष्य धरून कोणत्या दिशेला बाण मारतील, सांगता येत नाही.

will congress leadership accept political suggestion of salman khurshid??

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात