‘ममताराज’ : तृणमूलने पुन्हा केला  राज्यपालांचा अपमान ; म्हटले विक्षिप्त रक्तपिपासू आणि वेडा कुत्रा


  • तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले, “राज्यपाल हे एक पागल आणि रक्तपिपासु आहेत त्यांनी येथे एक मिनिटसुद्धा थांबू नये.ते वेड्या कुत्र्यासारखे इकडे-तीकडे फिरत आहेत.

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : नारदा प्रकरणावरून पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे तृणमूलच्या नेत्यांना अटक झाल्यानंतर राजकीय नाट्य रंगले आहे. याबाबत तृणमूल कॉंग्रेसचे (टीएमसी) खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले, “आम्ही न्यायालयात जात आहोत. तुम्हाला माहित आहे की सर्वोच्च न्यायालयाने कोविड -19 दरम्यान एक निर्णय दिला आहे की पोलिस कोणत्याही व्यक्तीला विनाकारण ताब्यात घेऊ शकत नाहीत, अटक करू शकत नाही.असे असूनही सीबीआय आणि पोलिसांनी आमच्या सदस्यांनाअटक केली आहे.

टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले, “राज्यपालांनी राज्य सरकारचा सल्ला न घेता सूड उगवण्यासाठी आसे केले आहे . राज्यपाल रक्तपिपासु बनले आहेत. आता त्यांना भाजपाकडून 2024 च्या निवडणुकीसाठी लोकसभेचे तिकीट हवे आहे म्हणून ते टीएमसीविरूद्ध जे काही वाटेल ते करत आहेत. ते पुढे म्हणाले,राज्यपाल हे पागल आणि रक्तपिपासु आहेत त्यांनी येथे एक मिनिटसुद्धा थांबू नये.ते वेड्या कुत्र्यासारखे इकडे-तीकडे फिरत आहेत.

9 मे रोजी राज्यपाल जगदीप धनखड यांनी या चार टीएमसी नेत्यांविरुद्ध सीबीआयला खटला चालविण्यास परवानगी दिली होती. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षांत शारदा घोटाळा आणि नारदा घोटाळ्याची चर्चा सुरू आहे. सीबीआयदेखील या प्रकरणांचा तपास करत आहे. या प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या नेत्यांची नावे समोर आली आहेत. या नेत्यांविरोधात खटला पुढे नेण्याची परवानगी राज्यपालांनी दिलेली आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात