… इसके बिना माफी अधुरी, असे म्हणत राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेताना देशाची माफी मागितली होती. पण त्यांची माफी पूर्ण कशी होणार? ते प्रायश्चित्त कसे करणार? असे खोचक सवाल काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी केले आहेत. Rahul Gandhi takes on PM Modi over farm laws and msp

… इसके बिना माफी अधुरी, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विट मधून त्यांनी पंतप्रधान मोदींवर विविध प्रश्नांच्या तोफा डागल्या आहेत. तुम्ही माफी तर मागितलीत, पण लखीमपुर हिंसाचार यासाठी जबाबदार असणाऱ्या मंत्र्यांना कधी काढून टाकणार? शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी आणि किती देणार? सत्याग्रहींवरचे खटले कधी मागे घेणार? पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपी वर कायदा कधी आणणार?, या प्रश्नांची उत्तरे द्या ती उत्तरे दिली नाहीत तर तुमची माफी अपूर्णच राहील, असे टीकास्त्र राहुल गांधी पीएनजी आपल्या ट्विट मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोडले आहे.जब PM ने कृषि-विरोधी क़ानून बनाने के लिए माफ़ी माँगी तो संसद में बतायें कि प्रायश्चित कैसे करेंगे- लखीमपुर मामले के मंत्री को बर्खास्त कब? शहीद किसानों को मुआवज़ा कितना-कब? सत्याग्रहियों के ख़िलाफ़ झूठे केस वापस कब? MSP पर क़ानून कब? इसके बिना माफ़ी अधूरी!

Rahul Gandhi takes on PM Modi over farm laws and msp

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण