चिनी नौदल ११० युद्धनौका बांधतेय; भारताचीही १० वर्षांची अद्ययावत संयुक्त सैन्यदल विकसनाची योजना!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून चीनचे नौदल तब्बल 110 बड्या युद्धनौका बांधते आहे. याची संपूर्ण माहिती भारतीय नौदलाकडे आहे. त्याचबरोबर भारतीय सैन्य दलांच्या संयुक्त विकसनाची योजना देखील तयार आहे. त्या योजनेवर वेगाने काम सुरू आहे, अशी माहिती नौदल प्रमुख एडमिरल हरि कुमार यांनी दिली आहे. China building 110 warships, India to counter it promptly

नौदलाच्या योजनांची सविस्तर माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. नौदल प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते प्रथमच पत्रकार परिषदेत बोलत होते. आत्मनिर्भर भारत योजनेतून तीनही सैन्यदलांचा गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सामग्री निर्मिती सुरू आहे. येत्या पाच वर्षांमध्ये भारतीय सैन्यदल अद्ययावत साधनांनी युक्त असतील. त्याही पुढच्या दहा वर्षांची संयुक्त सैन्य दल विकसनाची योजनाही तयार आहे. यामध्ये मनुष्य रहित स्वयंचलित युद्ध साधने विकसित करण्याची महत्त्वाची योजना समाविष्ट आहे. सैन्य दलांकडे भारताची हवाई सीमा, समुद्री सीमा आणि भौगोलिक सीमा रक्षण करण्याची पूर्ण क्षमता आहे, असा आत्मविश्वास ॲडमिरल हरी कुमार यांनी व्यक्त केला.



चीनचे नौदल सन 2008 पासून हिंदी महासागरात कारवाया करत आहे. परंतु, भारतीय नौदलाच्या युद्धनौकांचे आणि विमानांचे चिनी नौदलावर पूर्ण लक्ष आहे. भारतीय सागरी सीमांच्या रक्षणात कोणतीही कसूर सोडण्यात येत नाही. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या क्वाड देशांच्या नौदल समवेत आपला चांगला समन्वय आहे, याकडेही एडमिरल हरि कुमार यांनी लक्ष वेधले आहे.

चिनी नौदल जरी 110 युद्धनौका बांधत असले तरी भारताची ही क्षमता नौदलात वाढवण्याची पूर्ण तयारी सुरू आहे, हे एडमिरल हरि कुमार यांनी आवर्जून स्पष्ट केले आहे.

China building 110 warships, India to counter it promptly

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात