साखरपट्ट्यात सोमेश्वरचा पुन्हा दबदबा; अनुदानासह ४ हजारांचा विक्रमी ऊसदर

राज्यात सर्वोच्च अंतिम ऊसदर जाहीर करणारा सोमेश्वर पहिला

विशेष प्रतिनिधी

बारामती : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ गाळप हंगामासाठी अनुदानासह प्रतिमेट्रिक टन ४ हजार रुपये असा अंतिम ऊसदर जाहीर केला आहे. राज्यात आतापर्यंत जाहीर झालेल्या दरांमध्ये हा सर्वोच्च अंतिम ऊसदर असल्याचा दावा कारखाना प्रशासनाने केला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत या दरावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

कारखान्याने हंगामातील ऊसतोडीच्या कालावधीनुसार दर निश्चित केला आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये तुटणाऱ्या उसाला प्रतिटन ३ हजार ८०० रुपये, फेब्रुवारीतील उसाला ३ हजार ९०० रुपये, तर मार्चमध्ये तुटणाऱ्या उसाला ४ हजार रुपये प्रतिटन दर मिळणार आहे. कारखान्याच्या माहितीनुसार, एफआरपीपेक्षा प्रतिटन ५१५ रुपये अधिक दर देणारा हा निर्णय आहे.



दरम्यान, २०२५-२६ हंगामात सोमेश्वर कारखान्याने सुमारे १२.९८ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करत १२.२७ टक्के सरासरी साखर उतारा मिळवला. या काळात १५ लाख ५७ हजार ६५० साखर पोत्यांचे उत्पादन झाल्याचे कारखान्याने म्हटले आहे. एफआरपीपोटी प्रतिटन ३ हजार २८५ रुपये देय असताना आतापर्यंत ३ हजार ३०० रुपये प्रतिटन सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले

असून उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी २०२६-२७ हंगामासाठीही शेतकऱ्यांना विविध प्रोत्साहनपर अनुदाने देण्याची घोषणा करण्यात आली आहे. फेब्रुवारीत तुटणाऱ्या उसाला प्रतिटन १०० रुपये, मार्चमध्ये २०० रुपये, तर एप्रिल आणि त्यानंतरच्या उसाला ३०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. हार्वेस्टरद्वारे तुटणाऱ्या उसासाठी प्रतिटन ५० रुपये, तर १५ फेब्रुवारीनंतर तुटून गाळपासाठी आणलेल्या खोडव्याला प्रतिटन १०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.

आगामी हंगामासाठी कारखान्याकडे सुमारे ३९ हजार एकर ऊस नोंदविण्यात आला असून, त्यातून १२ ते १२.५० लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.

Someshwar reasserts dominance in the sugar belt; record cane price of₹4,000, including subsidy.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात