राजस्थान कॉँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुध्द उपमुख्यमंत्री सचिन पायलट संघर्षाची नांदी झाली आहे. मतदारसंघातील समस्या सुटत नाहीत म्हणून ज्येष्ठ आमदार हेमाराम चौधरी यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे चौधरी हे सलग सहा वेळा निवडून आले असून सचिन पायलट गटाचे आहेत.Pilot group against Gehlot again in Rajasthan Congress, MLA resigns as problems do not go away
विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थान कॉँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुध्द उपमुख्यमंत्री सचिन पायलट संघर्षाची नांदी झाली आहे. मतदारसंघातील समस्या सुटत नाहीत
म्हणून ज्येष्ठ आमदार हेमाराम चौधरी यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे चौधरी हे सलग सहा वेळा निवडून आले असून सचिन पायलट गटाचे आहेत.
चौधरी यांनी मंगळवारी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वारे पाठविला आहे. विधानसभा सचिवालयाने याला दुजोरा दिला आहे. हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न असून, तो लवकरच सोडवला जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी म्हटले आहे.
चौधरी हे बाडमेरच्या गुढामलानी विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा निवडून आलेले आमदार आहेत. त्यांच्या कार्यालयाने सांगितले की, चौधरी यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांचे राजीनामापत्र विधानसभा अध्यक्षांना पाठविण्यात आले आहे.
राजस्थान विधानसभा सचिवालयाने राजीनामा मिळाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला असून, त्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. डोटासरा यांनी ट्विट करून म्हटले आहे की,
हेमाराम हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ व सन्माननीय नेते आहेत. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याशी मी बोललो आहे. हे अंतर्गत प्रकरण आहे. त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल.
२०० सदस्यांच्या विधानसभेत चौधरी यांच्यासह काँग्रेसचे १०६ आमदार आहेत. चौधरी हे सचिन पायलट गटाचे आमदार आहेत. गेल्या वर्षी पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंड केले होते,
तेव्हा त्यांच्यासमवेत असलेल्या १८ आमदारांत हेमाराम चौधरी सहभागी होते. यावर्षी मार्चमध्ये जेव्हा राज्य विधानसभेत रस्ते व पुलाच्या अनुदान मागणीवर चर्चा करण्यात आली होती
तेव्हा काँग्रेस आमदार ब्रजेंद्र ओला व हेमाराम चौधरी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. रस्ते निमार्णाबाबत आपल्या भागावर अन्याय करण्यात आला, असा त्यांचा आरोप होता.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी चौधरी यांना मनापासून बोलणारा नेता म्हटले आहे. ते म्हणाले, त्यांचा राजीनामा आम्हा सर्वांना विचार करायला लावणारा आहे. चौधरी मनातले सर्व काही सभागृहाच्या पटलावर ठेवत आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App