स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनाच्या रूपाने एक संधीच, या देशाला ईश्वराचा आशीर्वाद लाभो – न्यायालयाचा पुन्हा हल्लाबोल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाने देशातील एकाही कुटुंबाला सोडलेले नाही, पण केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या हे गावीही नाही. ते अजूनही हस्तीदंती मनोऱ्यात राहात आहेत, असे ताशेरे दिल्ली उच्च न्यायालयाने ओढले.High court once again lashed on burocrats

लसटंचाईचा फटका बसलेल्या देशाला स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनाच्या रूपाने एक संधीच लाभल्याचे आणि या देशाला ईश्वराचा आशीर्वाद लाभो अशी प्रतिक्रियाही न्यायालयाने नोंदविली.



पॅनाकीया बायोटेक कंपनीने एक याचिका सादर केली आहे. मानवतेच्या व्यापक कल्याण व्हावे म्हणून स्पुटनिक व्ही लशीच्या उत्पादनासाठी तातडीने निधी मिळावा अशी विनंती त्यांनी केली आहे.

यावर न्या. मनमोहन आणि न्या. नवीन चावला यांनी केंद्राला धारेवर धरले. इतके बळी घेत असलेल्या जागतिक साथीचे थैमान माजले असतानाही केंद्र जिवंत नाही, अशा तीव्र शब्दांत ताशेरे ओढण्यात आले.

सेठी यांनी स्पष्ट केले की, देशात उत्पादन झालेली कोणतीही लस केंद्राच्या मंजुरीशिवाय निर्यात करता येत नाही. या लशी केवळ भारतीयांसाठी आहेत आणि याचा आपल्याला फायदा होईल.

High court once again lashed on burocrats

महत्वाच्या बातम्या 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात