कोरोना योद्ध्याची कोरोनाविरुद्धची झुंज अखेर अपयशी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पद्‌मश्री प्रसिद्ध हदयविकारतज्ज्ञ, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.के.के.आगरवाल (वय ६२) यांचे कोरोनाने निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना दिल्लीतील ‘एम्स’ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.Dr. K. K. agarwal no more

त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आगरवाल यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी, जानेवारीत कोरोना लस घेणारा पहिला फ्रंटलाईन वर्कर होण्याचा मानही मिळविला होता



मोटारीतून केलेल्या व्हिडिओतही त्यांनी याबद्दल माहिती दिली होती. वैद्यकीय सेवेतील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना २०१० मध्ये पद्‌मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर कोरोनाशी संबंधित अनेक जनजागृतीपर व्हिडिओ पोस्ट करून त्यांनी नेटिझन्सचे लक्ष वेधले होते. जवळपास दहा कोटी जणांनी ते पाहिले. दुर्देवाने, कोरोनानेच त्यांचा मृत्यू झाला.

Dr. K. K. agarwal no more

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात