कोंबडीला न मारताच चिकनची निर्मिती , सिंगापुरातील प्रयोगशाळेची कमाल : विक्रीसही परवानगी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सिंगापूरमध्ये कोंबड्यांना न मारता प्रयोगशाळेत तयार केलेलं चिकन विकलं जाऊ लागलं आहे. अशा चिकनच्या विक्रीची परवानगी दिलेला सिंगापूर हा जगातला पहिला देश ठरला आहे. डीडब्ल्यू हिंदी’च्या हवाल्याने’टीव्ही नाइन हिंदी’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. Lab Made Chicken is sold in the markets of Singapore

प्रयोगशाळेt जिवंत प्राण्यांची निर्मिती होत नाही. पण, मांसाची निर्मिती, ते वाढवण्यापर्यंत मानवाने यश प्राप्त केले आहे. त्यासाठी जिवंत प्राण्याच्या शरीरातल्या स्टेम सेल्स अर्थात मूळ पेशी घेतल्या जातात.



त्यांची प्रयोगशाळेत नैसर्गिक स्वरूपात वाढ केली जाते. त्यातूनच मसल फायबर्स तयार होतात. असे मांस तयार करताना जनावरांना मारावं लागत नाही. दुसरीकडे जनावरं वाढवताना ग्रीन हाउस गॅसचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होतं.

त्यामुळे पर्यावरणाला हानी पोचते. पण प्रयोगशाळेत मांसाची निर्मिती झाली, तर हे प्रदूषण कमी होऊ शकेल, असे ठोकताळे मांडले जात आहेत.

एका बर्गर एवढ्या मांसासाठी दोन कोटींचा खर्च

लाखो लोकांचं पोट भरू शकेल, एवढ्या मांसाची निर्मिती एका स्टेम सेलपासून होऊ शकते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. सध्या एका बर्गर एवढ्या मांसासाठी दोन कोटींचा खर्च येतो.

आता निर्मितीचा खर्च कमी करण्याचे संशोधन सुरू आहे. त्यामुळे भविष्यात जगभरात सगळीकडेच या प्रकारचं प्रयोगशाळा निर्मित मांस मिळू शकेल.

Lab Made Chicken is sold in the markets of Singapore

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात