आरएसएस प्रणित – स्वयंसेवक संचलित देशभरातील विलगीकरण आणि कोविड केअर सेंटरमध्ये १७,३०० बेड्सची  व्यवस्था


विशेष प्रतिनिधी

 

नवी दिल्ली : कोरोना  महामारीचा सामना करण्यासाठी  केंद्र आणि राज्य सरकार, प्रशासन, कोरोना योद्धे तसेच  समाज सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत.  सकारात्मकता आणि सामूहिक शक्तीच्या बळावर आपण या गंभीर संकटावर मात करू, या दृढविश्वासाने समाजातील विभिन्न संघटना आणि संस्थांनी  एकत्र येऊन समन्वय साधत अनेक आवश्यक उपक्रमांना सुरुवात केली. यामध्ये सेवाभावाच्या उद्देशाने  हजारो लोक सक्रीय आहेत.  RSS run covid care centers has more than 17000 beds

कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच दुसऱ्या लाटेतही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सेवा भारती सहित अन्य संघटना आणि संस्थांच्या माध्यमातून कोरोनाने प्रभावित झालेल्या कुटुंबियांच्या व गरजवंतांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.  या संकटकाळात स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार   प्राथमिक स्तरावर अनेक प्रकारची सेवाकार्ये सुरु केली आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी माध्यमांसाठी जाहीर केलेल्या पत्रकात स्वयंसेवकांनी केलेल्या सेवा कार्यासंबंधात माहिती दिली आहे.



कोरोना संभावित लोकांकरिता विलगीकरण केंद्र तसेच संक्रमितांसाठी कोरोना केयर सेंटर, सरकारी कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयांमध्ये मदत उपलब्ध करणे, मदतीसाठी हेल्पलाइन नंबर, ऑनलाइन आरोग्य मार्गदर्शन आणि सल्ला,  रक्तदान, प्लाझ्मा दान, अंत्यविधी कार्य, आयुर्वेदिक काढा आणि औषधांचे वितरण, समुपदेशन (काउंसलिंग),  ऑक्सिजनची पूर्तता करणे तसेच ऍम्बुलन्स सेवा,  भोजन, शिधावाटप,   मास्क तसेच लसीकरण  अभियान व जागरूकता, शव वाहन सारख्या आवश्यक कार्य स्वयंसेवकांनी सुरु केले आहेत.

मदतीकरिता स्वयंसेवकांच्यावतीने  देशभरात जवळपास ३८०० ठिकाणी हेल्पलाइन सेंटर्स चालविले जात आहेत. त्याचप्रमाणे लसीकरण शिबीर,  मदत  व जागरूकता अभियानात ७५०० हुन अधिक ठिकाणी २२ हजाराहून अधिक कार्यकर्ता सहभागी झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांचे लसीकरण करण्यात आले.  देशभरात  २८७ ठिकाणी विलगीकरण कक्ष  संचालित करण्यात येत आहेत,  ज्यामध्ये जवळपास ९८०० हुन अधिक बेड्सची व्यवस्था  याचसोबत ११८ शहरांत कोविड केयर सेंटर सुद्धा चालविले जात आहेत. ज्यामध्ये ७४७६ बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.  यापैकी २२८५ बेड्स   ऑक्सिजनयुक्त आहेत. या केंद्रावर ५१०० हुन अधिक कार्यकर्ता कार्य करीत आहेत.

याव्यतिरिक्त  सरकारी कोविड केयर केंद्रामध्ये देखील  स्वयंसेवक   सहयोग देत आहेत.   देशात  ७६२ शहरांमध्ये असलेल्या ८१९ सरकारी कोविड केयर केंद्रांमध्ये ६ हजारांहून अधिक कार्यकर्ता मदत करीत आहेत.  स्वयंसेवकांनी १२५६ ठिकाणी  रक्तदान शिबिरांचे आयोजन करून  ४४ हजार यूनिट रक्तसंचय केले आहे.  देशभरात  १४०० ठिकाणी असलेल्या वैद्यकीय  हेल्पलाइनच्या माध्यमातून दीड  लाखांहून अधिक जण  लाभान्वित झाले आहे. या केंद्रात ४४४५ डॉक्टर सेवा देत आहेत.

  • हेल्पलाइन सेंटर्स  – ३७७०
  • सरकारच्या मदतीने सुरु करण्यात आलेली लसीकरण केंद्रे  – २९०४
  • सरकारी केंद्रात  सहयोग आणि  जनजागरण  – ४७७३ ठिकाणी
  • सहभागी कार्यकर्ता संख्या – २२२७४
  • विलगीकरण  केंद्रे – शहरे – २८७, बेड्स  संख्या – ९८३८, कार्यकर्ता – ३१९४
  • कोविड केअर केंद्रे – शहरे – ११८, बेड्स  संख्या  – ७४७६, सेवा प्राप्त नागरिक – १८३७९, ऑक्सिजनयुक्त बेड्स  – २२८५, कार्यकर्ता – १९८९
  • ५ – सरकारी कोविड केअर केंद्रातील सहयोग – शहरे ७६२, केंद्रे –  ८१९, कार्यकर्ता – ६०३०
  • ऑनलाइन डॉक्टर मार्गदर्शन  स्थाने –  १३९९, सक्रिय डॉक्टर्स – ४४४५, सेवा प्राप्त नागरिक –  १,५१,२५७ 
  • संक्रमित कुटुंबे  / व्यक्तींना भोजन ठिकाणे  – ३३१५, आतापर्यंत वितरित पैकेट – ५,३७, ४३६
  • रक्तदान – ठिकाणे १२५६, रक्त यूनिट – ४३,९७२, प्लाझ्मा दान ठिकाणे ४२६, सेवा प्राप्त नागरिक – ४१९३
  • आयुर्वेदिक  काढा  वितरण स्थाने – ५९२१
  • सेवा प्राप्त नागरिक – ४०,५१,०८८ 
  • समुपदेशन केंद्र (काउन्सलिंग) स्थाने १२४२, सेवा प्राप्त नागरिक – ७५,७५१ 
  • अंत्यविधीसाठी मदत ठिकाणे ८१६, शव वाहन सेवा स्थाने -३०३

RSS run covid care centers has more than 17000 beds

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात