लडाखच्या सीमावर्ती भागात चिनी सैन्याचा उन्हाळी युद्ध सराव सुरू; भारतीय सैन्य दलाने टिपल्यात हालचाली


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – लडाखमध्ये २०२० मध्ये भारत – चीन सैन्यादरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर चिनी सैन्याच्या लडाखच्या सीमावर्ती भागात भागात हालचाली पुन्हा वाढल्या आहेत.PLA exercising in its depth areas opposite Ladakh, Indian forces watching closely

चिनी सैन्य लडाखमधल्या स्वतः हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर युद्ध सराव करीत असल्याच्या हालचाली भारतीय सैन्य दलाने टिपल्या आहेत. भारतीय सैन्य दले चिनी सैन्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे,



असे भारतीय सैन्य दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. अर्थात चिनी सैन्य काही ठिकाणी स्वतःच्या हद्दीत १०० किलोमीटरच्या आतमध्ये आहे. तरीही त्यावर भारतीय सैन्याची नजर आहे, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले.

चिनी सैन्य उन्हाळी मोसमात आपल्या स्वतःच्या हद्दीत सराव करीत असते आणि सराव झाल्यानंतर आपापल्या पोझिशन्सवर परत जाते असा अनुभव गेल्या वर्षीपर्यंत होता. परंतु, गेल्या वर्षी नियमित उन्हाळी सराव केल्यानंतर चिनी सैन्य माघारी गेलेच नाही.

उलट ते हॉट स्प्रिंग, गोग्रा, देप्सांग परिसरात आले. त्यातून भारतीय सैन्य आणि चिनी सैन्यामध्ये हिंसक संघर्ष उद्भवला होता. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले, तर चीनच्या ४० जवानांना प्राण गमावावे लागले होते.

आताही चिनी सैन्याच्या लडाखमध्ये स्वतःच्या हद्दीत सराव सुरू आहे. अपेक्षा आहे, की सराव संपल्यानंतर ते माघारी जातील. पण तसे घडले नाही, तर भारतीय सैन्य आपल्या पोझिशन्सवर सज्ज आहे. पायदळ, हवाई दल सज्ज आहे.

लडाखमध्ये राफेल विमानांचा ताफाही सज्ज आहे. तसेच इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स, तसेच माउंटन फोर्सही तैनात आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देखील भारतीय सैन्याच्या तैनातीत कोठेही कमी आलेली नाही, अशी ग्वाही भारतीय सैन्य दलाच्या प्रवक्त्याने दिली.

भारतीय सैन्याने पँगाँग लेक परिसर चिनी सैन्याकडून मोकळा करून घेतला. त्यांना तेथून माघार घ्यायला लावली. लडाखमध्ये फिंगर ४ पर्यंत भारतीय सैन्याची तैनाती आहे. हॉट स्प्रिंग आणि गोग्रामधूनही चिनी सैन्य माघारी जावे,

यासाठी अजून लष्करी पातळीवरच्या वाटाघाटी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर चिनी सैन्याचा उन्हाळी मोसमी सराव सुरू झाला आहे त्यामुळे भारतीय सैन्य हाय ऍलर्टवर आहे.

चिनी सैन्याने सरावात रणगाड्यांबरोबरच लघुपल्ल्याची क्षेपणास्त्रेही आणली आहेत. ती १५० ते २०० किलोमीटरच्या रेंजची असल्याचे सांगण्यात येते. पण भारतीय सैन्याने आपल्याही ताफ्यात क्षेपणास्त्रे तसेच हवाई दलाची लढाऊ विमाने तयार ठेवली आहेत.

चिनी सैन्याच्या कोणत्याही आगळिकीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य आता अधिक तयारीत असल्याचे सैन्य दलाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

PLA exercising in its depth areas opposite Ladakh, Indian forces watching closely

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात