काश्मीर ते कन्याकुमारी नव्हे… म्हणा, काराकोरम ते कन्याकुमारी! भाजपचे लडाख खासदार जमयांग नामग्याल यांचा नवा नारा

वृत्तसंस्था

लडाख : भारतीय जनता पक्षाचे तरुण खासदार जमयांग नामग्याल हे प्रखर राष्ट्रवादी म्हणून ओळखले जातात. त्यांनी आता एक नवा नारा दिला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी असे म्हटले जाते यापेक्षा काराकोरम ते कन्याकुमारी असे म्हणायला हवे, असे नामग्याल यांनी म्हटले आहे.  Say Karakoram to Kanyakumari, ask BJP young MP Jamyang Namgyal

नामग्याल यांनी एक ट्विट करून म्हटले आहे की, काश्मीरच्या वरच्या बाजुला लडाखमधील काराकोराम हा भारताचा भाग आहे. भारतातील नागरिकांना हे समजायला हवे आणि त्यांनी समजूनही घ्यायला हवे. काश्मीर ते कन्याकुमारी म्हणण्याऐवजी काराकेरम ते कन्याकुमारी म्हणणे जास्त योग्य होईल.नामग्याल यांनी आपल्या ट्विटसोबत एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये सियाचीन वॉरिअर्स असा फलक लिहिलेला असून त्यामध्ये काराकोरम ते कन्याकुमारी संपूर्ण भारत एक आहे, असे म्हटले आहे.

Say Karakoram to Kanyakumari, ask BJP young MP Jamyang Namgyal

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*