Raj Thackeray : मशिदींवरचे भोंगे उतरलेच पाहिजेत, अन्यथा महाराष्ट्रातल्या मनगटातील ताकद दाखवू; राज ठाकरेंची गर्जना!!


प्रतिनिधी

संभाजीनगर : फक्त महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या सर्व मशिदींवरचे भोंगे उतरलेच पाहिजेत अन्यथा महाराष्ट्रातल्या मनगटातील ताकद दाखवा. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाका. अजिबात घाबरू नका. अभी नही तो कभी नही!!, अशा कडक शब्दांमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी संभाजीनगरची सभा जबरदस्त गाजवून सोडली. Not only in Maharashtra, but in all the mosques in the country

मनसेचा मुंबईच्या गुढीपाडवा मेळावा, ठाण्यातली उत्तर सभा आणि त्यानंतरची संभाजीनगरची सभा या चढत्या क्रमाने राज ठाकरे यांच्या सभा गाजल्या. संभाजीनगरच्या सभेला मराठवाड्यातील जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला. राज ठाकरे यांचे भाषण देखील गुढीपाडवा मेळावा आणि ठाण्यातल्या उत्तर सभेपेक्षा अधिक आक्रमक होते. त्यांनी वारंवार मशिदींवरचे भोंगे उतरवलेच पाहिजेत. ते उतरले नाहीत, तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावाच. 3 तारखेपर्यंत ऐकून घ्या. पण 4 तारखेला यांचे भोंगे उतरले नाहीत तरी त्यांना सोडू नका, असे खणखणीत आवाहन राज ठाकरे यांनी करून सभेत चैतन्य भरले. सभेला हजर असणाऱ्या जनतेने देखील प्रचंड गर्जना करत राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.



शरद पवारांवर टीकास्त्र

यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा जोरदार शरसंधान साधले. मात्र यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेणे टाळले. शरद पवार यांनीच राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीपातीचे विष कालवले. केवळ स्वतःचे आमदार निवडून आणण्यासाठी प्रत्येकाला जातीच्या चष्म्यातून पाहिले. पुस्तके देखील जातीच्या चष्म्यातून वाचली आणि आज जातीपातीचे विष शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहोचले आहे, असे जोरदार टीकास्त्र राज ठाकरे यांनी सोडले. शरद पवार नास्तिक आहेत हे त्यांच्या मुलीनेच लोकसभेत सांगितले आहे. त्यांना हिंदू शब्दाची अलर्जी आहे म्हणून ते जाती जातीत विष पसरवतात, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी पवार यांना ठोकून काढले.

जेम्स लेनच्या इंडिया टुडे च्या मुलाखतीचा अहवाल त्यांनी देऊन त्याची आणि बाबासाहेब पुरंदरे यांची कधीच भेट झाली नाही असे स्पष्ट केले शरद पवार यांनी बाबासाहेबांना त्यांच्या उतारवयात त्रास दिला. छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली. आपल्या पहिल्या वर्तमानपत्राचे नाव “मराठा” ठेवले, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.

राज ठाकरे यांच्या भाषणाच्या वेळी भोंग्यावरून अजान सुरू झाली. त्यावेळी राज ठाकरे प्रचंड संतापले आणि त्यांच्या तोंडात बोळा कोंबा. त्यांना नीट समजावून सांगा, असे संतप्त आवाहन त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना केले. भोंग्यांच्या विषयाचा सोक्षमोक्ष लावा. त्यांचे मशिदींवरचे भोंगे उतरल्यानंतर मगच मंदिरांवरचे भोंगे उतरावा. भोंग्याचा विषय धार्मिक नाही. तो सामाजिक विषय आहे, असे राज ठाकरे वारंवार म्हणाले.

केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर संपूर्ण देशातल्या मशिदींवरचे भोंगे उतरले पाहिजेत आणि ते उतरवले नाहीत, तर महाराष्ट्रातल्या मनगटातील ताकद दाखवा. एकदा काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाका. आता काय व्हायचे ते होऊ द्या!!, असे खणखणीत आवाहन करत त्यांनी आपले भाषण संपवले. भाषण संपवताना देखील त्यांनी भोंगे या विषयावर महाराष्ट्राच्या जनतेला पेटवून घेतले. आता इथून पुढे 3 तारखेनंतर नेमके काय होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Not only in Maharashtra, but in all the mosques in the country

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात