भाजपच्या राजवटीतच मुस्लिम सर्वात सुरक्षित आणि आनंदी, विरोधकांनी कायम मतपेटी म्हणून वापर केला, मुस्लिम राष्ट्रीयमंचाचा आरोप


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राजवटीतच मुस्लिम सर्वात सुरक्षित आणि आनंदी आहेत. कॉँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने मुस्लिमांचा कायम मतपेटी म्हणून वापर केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन मुस्लिम राष्ट्रीय मंचाने केले आहे.Muslim safest and happiest during BJP rule, used by opposition as permanent ballot box, Muslim National Forum alleges

राष्ट्रीयस्वयंसेवक संघाच्या अंतर्गत काम करणाºया मुस्लिम राष्ट्रीय मंचाने भाजप सरकारने समाजाच्या कल्याणासाठी राबविलेल्या विविध योजनांची यादी जाहीर केली आहे. भाजपच देशातील मुस्लिमांचा सर्वात मोठा हितचिंतक आहे, असेही म्हटले आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष (एसपी) आणि बहुजन समाज पक्ष (बसपा) या विरोधी पक्षांनी मुस्लिमांनाच आपली व्होट बँक मानली, सत्तेत आल्यानंतर त्यांनी समाजातील सदस्यांना गरिबी, निरक्षरता, मागासलेपण दिला.



मुस्लिम राष्ट्रीय मंचाने याबाबत एक पत्रकही छापले आहे. संघटनेचे राष्ट्रीय संयोजक इंद्रेश कुमार यांच्या उपस्थितीत त्याचे प्रकाशन झाले. निवडणुका होत असलेल्या पाच राज्यांमध्ये त्याचे वितरण केले जाणार आहे, असे मंचाचे मीडिय प्रभारी सईद सईद यांनी सांगितले. ते म्हणाले की, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाबमधील अल्पसंख्याक समाजातील सदस्यांना भाजपला मत देण्यासाठी पत्रके वाटली जातील.

नरेंद्र मोदी सरकारने 2014 पासून अल्पसंख्याक समुदायांच्या कल्याणासाठी नई रोशनी, नया सवेरा, नई उडान, खोज और कमाव, उस्ताद आणि नई मंजिल यासह तब्बल 36 योजना सुरू केल्या आहेत. पंतप्रधान आवास योजना, मुद्रा योजना, जन धन योजना, उज्ज्वला योजना, अटल पेन्शन योजना, स्टार्टअप इंडिया आणि मोदी सरकारने सुरू केलेल्या इतर योजनांचाही अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना फायदा झाला, असे त्यात म्हटले आहे.

भाजप सत्तेवर आल्यास मुस्लिमांना देशातून हाकलून दिले जाईल, असे म्हणत काँग्रेस, सपा आणि बसपासह विरोधी पक्ष अनेक दिवसांपासून आरएसएस आणि भाजपच्या विरोधात अपप्रचार करत आहेत.गेल्या सात वर्षांत किती मुस्लिमांना देशातून हाकलून देण्यात आले? असा सवाल सईद यांनी केला. उलट 2014 पासून मुस्लिमांवरील अत्याचाराच्या घटना, जातीय दंगलीकमी झाल्या आहेत.

भाजप सरकार मुस्लिमांचे सर्वात मोठे हितचिंतक आहे. निवडणुकीच्या वेळी काँग्रेस, सपा-बसपाला बळी पडू नका. भाजपच्या राजवटीत देशातील मुस्लिम सर्वात सुरक्षित आणि सुखी आहेत आणि यापुढेही राहतील. हुशारीने मतदान करा. अगदी छोटीशी चूक देखील अडचणीचे कारण बनू शकते, असेही या पत्रकात म्हटले आहे.

Muslim safest and happiest during BJP rule, used by opposition as permanent ballot box, Muslim National Forum alleges

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात