पन्नास वर्षांपासून हाती कॉँग्रेसचा झेंडा, न्याय न मिळाल्याने पंजाबमधील ज्येष्ठ नेत्याचा आपमध्ये प्रवेश


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : पंजाबमध्ये कॅ. अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर कॉँग्रेसची अवस्था नाजूक झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तब्बल ५० वर्षे कॉँग्रेसचा झेंडा हाती घेऊन राजकारणात असलेल्या एका ज्येष्ठ नेत्याने न्याय मिळत नसल्याने आम आदमी पक्षात (आप) प्रवेश केला आहे.Congress flag in hand for fifty years, senior leader from Punjab joins AAP due to lack of justice

ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जोगींदर मान यांनी काँग्रेसला राजीनामा दिल्याच्या एका दिवसानंतर शनिवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. जोगींदर मान यांचा राजीनामा हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या काही आठवड्यांपूर्वी पक्षाशी असलेले त्यांचे ५० वर्षांचे संबंध तोडले आहेत.



जोगींदर मान हे पंजाबमधील अनुसूचित जातीचे नेते आहेत. ते शिष्यवृत्ती घोटाळ्यातील दोषींवर कोणतीही कारवाई न केल्याबद्दल पंजाबमधील काँग्रेस सरकारवर नाराज होते. फगवाडा या त्यांच्या मतदारसंघाला जिल्ह्याचा दर्जा देण्याच्या वारंवार केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात होते.

याच नाराजीतून त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि आम आदमी पक्षात प्रवेश केला.आपचे आमदार आणि पंजाबचे सह-प्रभारी राघव चढ्ढा यांनी जोगींदर मान यांचं पक्षात स्वागत केलं. ते म्हणाले की, मान यांच्यासारख्या दिग्गज नेत्याच्या आप प्रवेशामुळे राज्यात पक्षाला मोठी चालना मिळेल.

Congress flag in hand for fifty years, senior leader from Punjab joins AAP due to lack of justice

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात