संजय राऊत राहताहेत राष्ट्रवादीला धरून; शिवसेना नेते मात्र ठोकताहेत राष्ट्रवादीला घेरून!!


शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत सध्या काँग्रेस पक्षावर खूपच चिडलेले दिसत आहेत. गोव्यात त्यांनी खूप मोठी शिष्टाई करूनही शिवसेनेची राजकीय डाळ काँग्रेसच्या नेत्यांनी शिजू दिली नाही. राष्ट्रवादीला तर त्यांनी जवळ देखील उभे राहू दिले नाही. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी काँग्रेसवर बरीच आगपाखड करून घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू त्यांनी एक प्रकारे उचलूनही धरली आहे.Sanjay Raut lives holding NCP; Shiv Sena leaders, however, are attacking the NCP

महाविकास आघाडी मधला घटक पक्ष म्हणून संजय राऊत यांनी राष्ट्रवादीची बाजू उचलून धरणे हे मित्रत्वाचे लक्षण मानले पाहिजे. पण एकीकडे संजय राऊत हे राष्ट्रवादीशी आपली मैत्री इमानेइतबारे निभावत असताना शिवसेनेचे बाकीचे नेते मात्र अनेक पातळ्यांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी आपला उभा दावा असल्याचे विसरू शकत नाहीत आणि त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना बिंधास्त ठोकताना दिसत आहेत.



ठाण्यामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समोर शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आजच एकमेकांना भिडले. कळव्यातील एका पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात नेमके श्रेय कोणाचे आणि पोस्टरबाजी कोणाची यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार वाद झाला. कार्यकर्ते एकमेकांना भिडले तर नगरसेवक तरी कसे मागे राहतील म्हणून नगरसेवकही एकमेकांना भिडले आणि एकनाथ शिंदे – जितेंद्र आव्हाड यांच्या समोरच दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी एकमेकांची राजकीय अब्रू काढली…!!

एवढेच नाही तर व्यासपीठावरील वादानंतर एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांना चिमटा काढला. ते स्वतःला बापाच्या भूमिकेत समजतात तर आमच्या सारख्या मुलांचे यश त्यांना का खुपते?? असा खोचक सवाल डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला आव्हान देताच शिवसेना नेत्यांनी फणा काढाला…!!

ठाण्यातला हा प्रकार काल दुपारी घडला. तसाच प्रकार कोल्हापूर मध्येही घडला. कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार आणि शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना दम दिला. कोल्हापूर उत्तर कडे नुसते बघायचे सुद्धा नाही. आम्ही अजिबात ऐकून घेणार नाही. कोल्हापूर उत्तर वर मालकी शिवसेनेची आहे, हे त्यांनी ठणकावून सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आम्ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना काय चीज आहे हे दाखवून दिले आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आमच्या वाटेला जाऊ नये, असा गंभीर इशारा राजेंद्र क्षीरसागर यांनी देऊन कोल्हापूर जिल्ह्यातले राजकीय वातावरण एकदम तापवून टाकले आहे.

संजय राऊत यांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी असलेले संबंध सर्वश्रुत आहेत. किंबहुना त्या दोन नेत्यांच्या मधूर संबंधातूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या जवळ यायला मदत झाली आहे. फक्त भाजपला महाराष्ट्रातल्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले असले तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आणि निमशहरी भागात शिवसैनिक टक्कर घेतो ती खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी.

शिवसेना आणि राष्ट्रवादीतले हे राजकीय वैर फार जुने आहे किंबहुना ग्रामीण भागात शिवसेनेची वाढ काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून वगळल्या गेलेल्या दमदार कार्यकर्त्यांच्या आधारावर झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातले आणि निमशहरी भागातले शिवसैनिक अधिक कडवेपणाने राष्ट्रवादी काँग्रेसशी लढताना दिसतात आणि उरलेल्या ठिकाणी काँग्रेसशी लढताना दिसतात. ठाण्यातला आजचा प्रकार आणि कोल्हापूरमध्ये राजेंद्र क्षीरसागर यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकाने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना दिलेला दम यातून बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट शिवसैनिकांचा “खरा दमखम” दिसतो आणि तो संजय राऊत यांना न आवडणारा आणि त्याहीपेक्षा न झेपणारा आहे…!!

Sanjay Raut lives holding NCP; Shiv Sena leaders, however, are attacking the NCP

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात