शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दर वेळेला पवारांची “उंची” का सांगावी लागते??


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात “उंच” कोण? “खुजे” कोण? याची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतीच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सह्याद्रीची उपमा देऊन झाली. भाजपच्या नेत्यांना त्यांनी “टेकड्या” म्हणून घेतले. या मुद्द्यावरून संजय राऊत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या जोरदार कलगीतुरा रंगला होता.Shiv Sena and NCP leaders Why Pawar height has to be mentioned every time

आता हा कलगीतुरा रंगून दोन दिवस उलटत आहेत ना तोच दोन वेगळ्या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या “उंची”वरून कलगीतुरा रंगला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकेकाळी त्यांच्याबरोबर पहाटे शपथ घेतलेले उपमुख्यमंत्री आणि विद्यमान देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात हा कलगीतुरा रंगला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधताना त्या पक्षाला गल्लीतला पक्ष म्हणून घेतले आहे. साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष. नावात नुसतेच राष्ट्रवादी पण म्हणून काही पक्ष राष्ट्रीय पातळीवरचा होत नाही, असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.

सध्या महाराष्ट्राचे राजकारण सोडून फडणवीस हे गोव्याच्या निवडणुकीच्या राजकारणात गुंतले आहेत. कारण त्यांच्याकडे गोव्याचा “प्रभारपण” आहे. ते गोव्यातून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर शेलक्या शब्दात निशाणा साधत आहेत. आता देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हटल्यावर राष्ट्रवादीचे नेते उसळले नसते तरच नवल…!!

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांना त्यांच्या इतक्या शेलक्या नव्हे पण जरा संयमी शब्दात परखड प्रत्युत्तर दिले आहे. देशाच्या राजकारणात शरद पवार यांची उंची लक्षात घेऊन नव्या पिढीच्या नेत्यांनी संयमाने बोलले पाहिजे, असे अजितदादांनी फडणवीसांना ऐकवले आहे.



देशाच्या राजकारणात शरद पवारांना एक विशिष्ट स्थान आहे. त्यांचे वय, राजकीय अनुभव याविषयी सर्व पक्षांमधील नेत्यांना आदर आहे. अनेक पक्षांचे नेते त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर विचारविनिमय करत असतात ही बाब खरीच आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्र मंच या नावाच्या एका राजकीय मंचाची बैठक काहीच महिन्यांपूर्वी भारताचे माजी अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यशवंत सिन्हा यांनी भरवली होती.

अर्थात नंतर पवारांनी त्या राष्ट्र मंचाशी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला होता. पण त्यामुळे शरद पवारांचे राष्ट्रीय राजकारणातील स्थान डळमळीत होण्याचे कारण नाही. त्यांचे देशाच्या राजकारणात विशिष्ट स्थान आहेच आहे. शिवाय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “गुरू” देखील आहेत. त्यामुळे तर त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील स्थानाला “विशेषत्व” प्राप्त होते. आता अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आणि नावात राष्ट्रवादी असूनही दिल्लीतले नव्हे, तर गल्लीतले राजकारण करणारा पक्ष असे म्हटल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते चिडतील नाहीतर काय?? बरोबरच आहे, त्यांचे चिडणे…!!

पण… मग राष्ट्रवादीचे नेते दरवेळी त्यांच्या पक्षावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना शरद पवार यांची “उंची”च का काढतात? किंवा संजय राऊत देखील दरवेळी भाजपवर टीका करताना शरद पवार यांची राजकीय उंची आणि देशाच्या राजकारणातले त्यांचे स्थान नेहमी “अधोरेखित” का करत असतात?? किंबहुना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना शरद पवार यांचे राष्ट्रीय राजकारणात विशिष्ट स्थान आहे असे वारंवार का म्हणावे लागते…?? बाकी कोणत्याही नेत्याच्या बाबत अशी शंका येत नाही. फक्त पवारांच्या बाबतीत शंका घेण्याचे कारण काय…??

भाजपचे कोणतेच नेते आता अमित शहा हे केंद्रीय राजकारणात आहेत. जे. पी. नड्डा हे राष्ट्रीय राजकारणात आहेत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहे, असे आवर्जून सांगताना दिसत नाहीत. शिवाय काँग्रेसचे नेते देखील राहुल गांधी हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत. सोनिया गांधी या आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत किंवा प्रियांका गांधी या राष्ट्रीय पातळीवरील नेत्या आहेत, असे वारंवार सांगताना दिसत नाहीत.



मग शरद पवार यांचा उल्लेख करताना राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना वारंवार ते राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत. शरद पवार यांची उंची मोठी आहे. राष्ट्रीय राजकारणातील त्यांचे स्थान मोठे आहे, असे वारंवार का सांगावे लागते?? दरवेळी विरोधकांना शरद पवार यांच्या राजकीय उंचीची आठवण का करावी करून द्यावी लागते…??

शरद पवार यांची राष्ट्रीय राजकारणातील उंची जर एवढी मोठी आहे, त्यांचे राष्ट्रीय राजकारणातील स्थान एवढे अढळ आहे, तर त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणात त्यांच्या उंचीचे स्थान का नाही मिळाले? ते कोणी मिळू दिले नाही? किंवा ते कोणाला मिळवता आले नाही??

राष्ट्रवादी काँग्रेसवर उपप्रादेशिक पक्ष असल्याची टीका एकट्या देवेंद्र फडणवीस यांनी किंवा चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेली नाही. आज तर अगदी केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले यांनी देखील राष्ट्रवादीला प्रादेशिक पक्ष म्हणून संबोधले आहे. हे असे नेहमी का होते?? याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करणार आहेत की नाही? की फक्त शरद पवारांची उंची मोजत बसून आणि ती खूप मोठी आहे असे सांगत बसून समाधान मानणार आहेत??

शरद पवार यांच्या राजकीय उंची विषयी कोणालाही शंका नाही. तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारणातले स्थान शरद पवार यांच्या उंची इतके नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याला विरोधक तरी काय करणार? आणि यासाठी नुसती शरद पवारांची उंची मोजून भागणार नाही. राष्ट्रवादीच्या यशाची उंची तेवढी वाढली तर ही टीका बंद होईल. हे सांगायला फार मोठा रॉकेट सायन्स सारखा अभ्यास करून राजकीय विश्लेषण करणाऱ्याची गरज नाही…!! पण हे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगणार कोण?? आणि सांगितले तरी ते ऐकणार कोण…??

Shiv Sena and NCP leaders Why Pawar height has to be mentioned every time

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात